वार्धक्याविषयी बोलू काही…
Category:
लेखसंग्रहजीवनातला शेवटचा टप्पा वार्धक्य. याची आखणी जर तरुणपणापासून व्यवस्थित केली तर हा अटळ प्रवास आनंदमयी होईल. आयुष्याचा आलेख पाहिला तर जन्मापासून पंचविशीपर्यंत चढण असते, पंचविशीनंतर तिशीपर्यंत सपाट पठार व तिशीनंतर घसरण सुरू होते, पण ती वर्षाला १ टक्का इतकी मंद असल्याने लक्षातही येत नाही.