व्याधिक्षमत्वाचा विचार (असा सुद्धा)
Category:
लेखसंग्रहकठलाच भारतीय ‘२२ मार्च २०२०’ ही तारीख यापुढे विसरणार नाही. मुक्तपणे सर्वत्र संचार करणारे सर्व लोक एका आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आपल्या घरामध्ये स्वतःला कोंडून घेऊ लागले. त्या चार भिंती त्याच्यासाठी संरक्षक कवच बनल्या. आम्हा डॉक्टरांना दवाखान्यात जाण्यासाठी घराबाहेर पडावे लागत होते, त्यावेळी तो रस्त्यावरील शुकशुकाट, निर्मनुष्य रस्ते, एकही गाडी नाही, ट्रॅफिक नाही अशी भयाण शांतता, भयाण सन्नाटा आयुष्यात पूर्वी कधीच अनुभवला नव्हता.