अलक
Category:
साहित्य - ललितमुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. दुपारी अडीच तीनची वेळ. कर्जतकडे जाणारी लोकल प्लॅटफॉर्मवर उभी होती. सुटायला वेळ होता आणि सिग्नलही लाल होता. सगळ्यात पुढच्या डब्याच्या सगळ्यात पुढच्या दरवाजात साठीच्या जवळ आलेले प्रभाकरपंत उभे होते. सिग्नल न्याहाळत.