लेखसंग्रह

यारी है इमान मेरा

Category:

 

तीन अतिशय वेगळ्या स्वभाव वैशिष्ट्य असणारे मित्र..त्यांची घट्ट मैत्री..त्यांचे स्वतःचे प्रेमाविषयीच्या, रिलेशनशिप विषयीच्या वेगवेगळ्या संकल्पना.. त्यांच्या करियरच्या वेगवेगळ्या वाटा. तरीही तिघे एकत्र येतात तेंव्हा ‘मैत्रीचा सोहळा’ सजरा करतात असे हे तीन मित्र.. सिद्धार्थ, समीर आणि आकाश.

लेखसंग्रह

एका कपड्याचा रंग दुसऱ्या कापडाला लागला तर तो सहज जात का नाही?

Category:

 

सहसा आपण धुवायचे कपडे साबणाच्या पाण्यात भिजवतो, त्यामुळे असे रंगीत कपडे व इतर पांढरे किंवा अन्य एकत्र भिजवल्यास ह्या रंगीत कापडाचा रंग काहीवेळा दुसऱ्या कपड्याला लागतो. साबणाच्या पाण्यात ही प्रक्रिया अधिक जलद होते.

लेखसंग्रह

नवं कुटुंब

Category:

 

‘काय दादानू? कसल्या गजाली चलल्यात?’ मनोहरच्या प्रश्नाने दोघेही आपल्या विचारचक्रातून बाहेर आले. ‘काही नाही रे, संध्याकाळ झाली की जरा एकटेपणा वाटतो.’ संजय म्हणाला. ‘दिवस जातो मजेत. पण संध्याकाळला कातरवेळ म्हणतात ते उगीच नाही. मन सैरभैर होतं, कारणाशिवायच.’ सुजाताही म्हणाली.

लेखसंग्रह

आयुष्य ज्यांना फितूर आहे…

Category:

 

जाणोनी लोटली मी या वादळात होडी’ ही सचोटी भीमसेन यांच्या गाण्यात जशी होती तशीच गाडी चालवण्याबाबत. गाणं असेल तेव्हा किंवा डोक्यात राग असला की भीमसेन निघालेच ड्रायव्हिंग करत. वाट कुठे फुटेल तिकडे. ते कोठे हे त्यांना देखील माहित नसायचं. त्यामुळे इतरजण शोधत बसत कुठे कुठे…

अवर्गिकृत

नेमकं वजन मोजायचं योग्य साधन कोणतं?

Category:

 

भाजीचं वजन करतांना भाजीवाला तराजू नावाचं जे साधन वापरतो, त्याने तो भाजीचं वजन मोजत नाही. तो फक्त मापाचं वजन आणि भाजीचं वजन यांची तुलना करतो. मग एखाद्या वस्तूचं वजन करायचं असेल तर काय करता येईल?

कथा

भिंत

Category:

 

आगरी भाषेत (भिवंडी भागातील) ग ऐवजी ज, ग किंवा घ ऐवजी झ, ण ऐवजी न, ड ऐवजी र, ळ ऐवजी ल तसेच काय ला क, आहे ला ह आणि मी व मला ऐवजी मना असे शब्द वापरले जातात, आगरी बोलीभाषेतील शब्द वापरून कथा लिहिण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.

हॅलो, वंसा, मी मंगल बोलताव, तुमी कई पन करा ना एखाद दोन दिसान तुमचे बारके भावासला भेटाला या. काल पाश्श्या त्यावी निस्ती हाय खाल्ले, “माजी बाय मना भेटाला कला येइ नाय मीनी क केले आवरा?” असाच बोलतान. कुंदा ताईने तिच्या भावजयीला, मंगल ला सांगितले की, उद्या सकाळीच ती दोन दिवसांसाठी राहायला येतेय. तसं रमेशला म्हणजेच तिच्या सगळ्यात लहान भावाला सांगायला सांगितले.