No Picture
कथा

एक परीस स्पर्श (भाग – ४०)

Category:

 

सध्या ! विजय काय विचार करतोय ? हे त्याच्याच शब्दात … काही दिवसांपासून मी टी. व्ही. वर पिंकीचा विजय असो ! ही नवीन मालिका पाहतोय ! त्यातील नायिका म्हणजे पिंकी कोणताही विषय तिच्या लग्नापर्यत नेण्यात तरबेज असते…तसेच काहीसे माझ्या घरातील लोकही तरबेज झालेत, कोणताही विषय ते माझ्या लग्नापर्यत अगदी सहज नेतात …आज सकाळी – सकाळी बाबांचा प्रश्न…गावची तिकीट काढायला सांगू ना ? त्यावर नेहमी प्रमाणे मी नाही म्हणालो,” का ?

No Picture
अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – ४३ – राजकुमारी अमृत कौर

Category:

 

पंजाब मधील जलीयनवाला बाग हत्या कांडाने त्यांचे मन उद्विग्न झाले, भारतावरील ब्रिटिश राजवटीचे काळे रंग सगळ्या देशाने अनुभवले. राजकुमारी अमृत कौर आतून हलल्या. त्यांच्यावर गांधी विचारधारेचा पगडा होताच. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. गावा-गावातून फिरून लोकांमध्ये स्वातंत्र्य चळवळी बद्दल जागरूकता निर्माण केली. त्यावेळची परिस्थिती म्हणजे कितीतरी लोकांना आपण पारतंत्र्यात आहोत म्हणजे काय ह्याचेसुद्धा आकलन नव्हते. त्याचबरोबरीने समाजात बरीच सुधारणा आवश्यक आहे जे त्यांना जाणवलं. बाल विवाह बंदी, परदा प्रथा किव्हा देवदासी ह्या सगळ्यांविषयी त्या बोलल्या. लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली. दांडी यात्रा, चले जाव आंदोलन ह्या सगळ्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. प्रत्येकवेळी त्यांना कारावास सश्रम भोगावा लागला.

No Picture
लेखसंग्रह

एक नाणे, दोन बाजू: पर्यटन आणि पर्यावरण

Category:

 

आपल्या भारतातील पयर्टन क्षेत्राचा आढावा घ्यायचा झाला तर जुन्या काळात आपल्याकडे जी तीर्थाटनाला जायची पद्धत होती तो भारतातील पर्यटनाचा उगम. पुढे ब्रिटिशांच्या काळात गोया साहेबाने इथला उन्हाळा सोसेना म्हणून अगदी माथेरानपासून मसुरीपर्यंत भारतभरातली हिलस्टेशन्स शोधून काढली आणि उन्हाळ्यात तिकडे जाण्याची पद्धत पडली.

No Picture
लेखसंग्रह

ब्लॅक होल

Category:

 

वैज्ञानिकदृष्ट्या, ब्लॅक होल हा अंतराळातील एक अत्यंत मजबूत गुरुत्वाकर्षणाचा भाग आहे की प्रकाश देखील त्यातून बाहेर पडू शकत नाही. सर्वसाधारणपणे कृष्णविवर म्हणजे अगदी लहान बिंदूमध्ये मोठ्या वस्तुमानाचे संकलन होय. ब्लॅक होलच्या प्रदेशाची सीमा ज्यातून सुटणे शक्य नाही त्याला इव्हेंट होरायझन असे म्हणतात. प्रकाश परावर्तित होत नसल्याने ब्लॅक होलचे निरीक्षण करणे कठीण आहे. गुरुत्वाकर्षण ही सर्वात कमकुवत शक्ती मानली जात असली तरी कृष्णविवरांच्या बाबतीत ती खूप मजबूत असते. जेव्हा खूप मोठे तारे त्यांच्या चक्राच्या शेवटी कोसळतात तेव्हा तारकीय वस्तुमानाचे ब्लॅक होल तयार होणे अपेक्षित असते. बहुसंख्य आकाशगंगांच्या केंद्रांमधून सुपर मॅसिव्ह कृष्णविवर बाहेर पडतात असाही अंदाज आहे.

No Picture
कथा

एक परीस स्पर्श (भाग – ३९)

Category:

 

दोन दिवसावर विजयच्या मामाच्या मुलाचे लग्न आल्यामुळे आणि विजयचा मामा विजयच्याच इमारतीत राहात असल्यामुळे लग्नाला येणारे सर्वच नातेवाईक विजयच्या आईलाही भेटायलाही येणारच ! त्यामुळे निदान त्यांच्यासमोर तरी विजय बरा दिसावा म्हणून विजयच्या आईने विजयला केस काळे करून यायला सांगितले ! आईने सांगितले नसते तरी त्याने ते केलेच असते कारण सार्वजनिक कार्यक्रमात अथवा लग्नासारख्या कार्यक्रमात वागण्या बोलण्याचे नव्हे तर दिसण्याचेही विजयचे एक तंत्र आहे..

No Picture
व्यक्ती-परिचय

रोहिणी भाटे

Category:

 

रोहिणी भाटे यांचा शिष्यपरिवार जगभर विखुरला आहे. १९४७ मध्ये त्यांनी नृत्यभारती कथक नृत्य अकादमी स्थान केली. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांच्या अनेक शिष्यांना गुरु रोहिणीताईंच्या अखंड मार्गदर्शनाचा प्रत्यक्ष लाभ मिळाला.