No Picture
कथा

एक परीस स्पर्श ( भाग – ५२)

Category:

 

भविष्य कोणालाही बदलता येत नाही. त्याने ते बदलण्यासाठी लाख भर रुपये खर्च केले तांत्रिक आणि मांत्रिकाकडे पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांच्या राहत्या जागेत दोष होता. त्यांनी ती जागा वेळीच सोडायला हवी होती. पण माणसाचा मोह त्याच्या भावभावना आडव्या येतात. त्यात त्याच्या कुटूंबात कोणीही देवाधर्माचे काहीही करत नव्हते. फक्त संकट आले म्हणून त्यांना देवाची आठवण येत होती. त्याच्याकडून कधीही कोणताही दानधर्म घडलेला नव्हता. त्यात त्याच्या कुटुंबात आलेल्या सुना त्याही नास्तिक होत्या.

No Picture
लेखसंग्रह

बदललेल्या जागा आणि गोष्टी

Category:

 

अगदी सकाळी झोपून उठल्यापासून विचार करायचा म्हटलं तर उठल्यानंतर शेजारच्या घड्याळाकडे जाणारे किंवा देवासमोर जोडले जाणारे हात आज मोबाईल कडे जाऊ लागलेयत. या दोघांची जागा त्याने कधीच बळकावलीय. त्यानंतर, ब्रश करताना मोरीत किंवा बेसिन समोर उभं राहूनच आपण ते करत होतो. आज ब्रशवर पेस्ट घेऊन आणि गॅलरीत उभं राहून ते ओंगळवाणं आणि ओघळणार दृष्य साऱ्या जगाला दाखवत अनेकजण ब्रश करत असतात.

No Picture
साहित्य - ललित

खर आणि खोटं

Category:

 

आज एक फार दिवसापूर्वीची गोष्ट आठवली. एखादे वाक्य जे खोटे आहे पण वारंवार खरं आहे खरं आहे असे सांगत गेले की ती गोष्ट खरच खरी आहे असे वाटते. अगदी तसेच एखाद्या माणसाला पण अनेक लोक मिळून चुकीचे ठरवतात तेव्हाही. तोच खोटा ठरतो.

No Picture
साहित्य - ललित

लोकरंगभूमीचे साक्षेपी संशोधक: डॉ. प्रकाश खांडगे

Category:

 

मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतर्फे डॉ. खांडगे गेली बारा वर्षे शिकवत आहेत. पीएच.डी.चे मार्गदर्शन असलेल्या डॉ. खांडगेंच्या मार्गदर्शनाखाली सात विद्यार्थी संशोधन करत आहेत.‘खंडोबाचं जागरण’ या पुस्तकासाठी त्यांना 2010चा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट संशोधन ग्रंथांचा वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे. या खेरीज शासनाचा सांस्कृतिक विभागाचा कलादान पुरस्कार मिळवलेल्या डॉ. खांडगेंनी भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या महापरिषदेवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. 2010मध्ये त्यांनी चीनमधील बीजिंग येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेत भारताचे नेतृत्व करताना लोकसंगीतावर निबंध सादर केला तर याचवर्षी अमेरिकेतील नॅशव्हिला येथे आंतरराष्ट्रीय लोकसाहित्य लोकसंस्कृती परिषदेत भारताचे नेतृत्व करताना लोककलांवर निबंध सादर केला.

No Picture
लेखसंग्रह

उत्कृष्ट अभिनेता -संजीव कुमार

Category:

 

संजीवकुमारने प्रत्येक रोल आव्हान म्हणून स्वीकारला. त्याची लांबी बघितली नाही कारण त्याला आपल्या अभिनयाच्या ताकदिवर पूर्ण विश्वास होता, त्याला दस्तक चित्रपट मिळाला.त्या चित्रपटाला अवॉर्ड मिळाले ( ह्या चित्रपटातील “ हम हे मताए कुचा बाजार की तरहा “ या गाण्यात संजीवकुमारची अगतिकता,चीड द्वेष पाहिली की संजीवकुमार काय चीज आहे हे लक्षात येते फक्त पाच ते दहा सेकंद त्याच्यावर शूट आहे ) कोशिश मध्ये तर एकही वाक्य नव्हते ,जे बोलायचे होते ते डोळे  व देहबोलीतून.नया दिन नई  रात ह्या चित्रपटासाठी आधी दिलीपकुमारला विचारले होते पण त्याने सांगितले की “ माझ्या पेक्षा  संजीवकुमार काम जास्त चांगले करेल.” उलझन चित्रपटांच्यावेळी सुलक्षणा पंडित त्याच्या प्रेमात पडली,पण त्याने नकार दिला.

No Picture
कथा

एक परीस स्पर्श ( भाग – ५१)

Category:

 

अनामिकेसाठी आपण इतकी वर्षे वाया घालवली याचा आता विजयला पश्चाताप होऊ लागला होता. त्याच्या आयुष्यात आलेल्या इतक्या जणी त्याच्या आयुष्यातून ह्या ना त्या कारणाने दूर गेल्या त्याचे त्याला इतके दुःख झाले नाही जितके अनामिकेच्या जाण्याने होईल… कारण अनामिकेच्या बाबतीत त्याला असे वाटत होते कि त्याचे आणि तिचे जन्मजन्मांतरीचा नाते आहे . त्यामुळे काहीही झाले तरी त्यांचे मिलन हे होणारच ! मग अख्खं जग आडवं आलं तरी ! पण हे तोपर्यतरच वाटत होत जोपर्यत तिच्याही मनात त्याच्याबद्दल ओलावा आहे असे विजयला वाटत होते.