साहित्य - ललित

विच्छा’ आमची अपुरीच राहिली

Category:

 

९८ च्या मार्चमधील चौदा तारखेला आम्हाला ‘दादा गेले’ असा फोन आला. दादा गेले हे मानायला मन तयार नव्हतं. दादांच्या सहवासात राहून अजून खूप काम करायचं बाकी होतं. त्यांना नवीन चित्रपट निर्मिती करायची होती. सगळंच अर्धवट सोडून दादा निघून गेले.

व्यक्ती-परिचय

वेस्ट इंडिजचे ज्येष्ठ खेळाडू जोएल गार्नर

Category:

 

खरतर त्याची महाकाय उंची बघूनच फलंदाजाच्या छातीत धडकी भरायची. गार्नरचा यॉर्कर सरळसोटपणे यष्ट्यांचा वेध घ्यायचा. मुळात यॉर्कर म्हणजे पायाच्या बुंध्यात टाकलेला चेंडू, त्यामुळे पायांना हालचाल करायला वाव जवळपास नाहीच आणि तशा अवस्थेत ऑफ स्टम्पच्या किंचित बाहेर पडलेला चेंडू आत येतो म्हणजे फलंदाजांची त्रेधातिरपीट नक्कीच.

व्यक्ती-परिचय

स्त्रियांचे सौंदर्य यावर संशोधन करणारे सर फ्रान्सिस गाल्टन

Category:

 

फ्रान्सिस गाल्टन यांच्या घराण्यात विज्ञानासंबंधी परंपरागत प्रेम होते. त्याच्या आजोबांनी- सॅम्युएल गाल्टननी बंदुका निर्मितीच्या व्यवसायात भरपूर पैसा कमावला होता. त्यामुळे शांतताप्रेमी समजल्या जाणाऱ्या क्वेकर पंथीयांचा त्यांनी रोष ओढवून घेतला होता.

व्यक्ती-परिचय

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री रावसाहेब रामराव पाटील ऊर्फ आर आर पाटील

Category:

 

आबा सत्तेची एक एक पायरी चढत गेले पण कुटुंबानं आबांप्रमाणेच आपला साधेपणा टिकवून ठेवला. पत्नी सुमन, मुलगा रोहित आणि मुलगी स्मिता, आई भागिरथी यांनी वागण्या बोलण्यात सत्तेचा दर्प येऊ दिला नाही. आबांचे एक भाऊ सुरेश हे गावाकडे शेती बघतात. तर दुसरे भाऊ राजाराम पोलीस दलात आहेत. आबा गृहमंत्री असतांना आबांचे भाऊ राजाराम पाटील पोलीस दलात कुठलाही बडेजाव न करता सेवा बजावत होते.

व्यक्ती-परिचय

थोरले माधवराव पेशवे

Category:

 

पानिपत येथे मराठयांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब मरण पावले, तेव्हा ही संधी मराठ्यांवर स्वारी करण्यास उत्कृष्ट आहे असे पाहून निजामाने लढाई सुरू केली. त्यावेळी राघोबा प्रमुख असल्यामुळे सेनापती राघोबाने राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्यास गाठून लढाई दिली. त्यात राघोबाचा पराभव व्हावयाचा परंतु ऐनवेळी माधवरावानें आपल्या तुकडीनिशी निजामाच्या सैन्यावर हल्ला करून जय मिळविला. त्या मुळे निजामाचा उद्देश सिद्धीस न जाऊन त्यास पेशव्यांशी तह करावा लागला.

कथा

एक परीस स्पर्श ( भाग – १५ )

Category:

 

विजयने दुसरा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आणि एक प्रेमपत्र लिहायला घेतलं. म्हणजे त्याच्या आयुष्यातील पहिलं आणि शेवटचं प्रेमपत्र लिहायला घेतलं. ते प्रेमपत्र हजार शब्दांचं होतं. त्या पत्राच्या शेवटी त्याने त्याच्या आयुष्यातील पहिली कविताही लिहिली होती.

कथा

मृत्यु नक्षलवादींचा का गरीब निष्पाप आदिवासींचा ? (कथा ३)

Category:

 

बस्तर व बिजापूर हे छत्तीसगड मधील नक्षल चळवळीचे महत्वाचे जिल्हे, बिजापूर जिल्ह्यातील सारकेकुडा, कोटागुडाव राजपेटा या तीन खेड्यात रात्री गावकीची सभा चालू असताना SRP नी कोणतीही सूचना न देता बेछुट गोळीबार केला, पळापळ झाली, सभा उधळली दुसर दिवशी चंद्रमोळ्या झोपडयां समोर पुरुष व मुलांची प्रेते कापडात गुंडाळलेली, हताश होऊन कपाळाला हात लाऊन बसलेली गावकरी मंडळी त्यात नक्षलवादी तर खरे कोणीच नव्हते,असा गावकऱ्यांचा ठाम दावा, काहीं मृत शरीरावर कुऱ्हाडीचे घाव होते ही सत्यस्थिती होती, आमचे पोलीस असले निर्घृण कृत्य कधीच करणार नाहीत, असा सरकार कडून फतवा काढण्यात आला. गावातील नागेश, महेश आणी सोमळू ही १५ ते १९ वर्षाची तरुण मुले कट्टर नक्षलवादी होती, हेही तितकेच खरे होते. नक्षलवादी अशा तरुण मुलांना हाताशी धरून त्यांचा ढाली सारखा उपयोग करीत असून ही त्यांची नवीन चाल आहे, अशा अनेक तरुण मुला मुलीना आमिष दाखवून गनिमी युद्धाचे शिक्षण देऊन परत खेड्यात पाठवितात खंडणी वसूल करण्यासाठी.

लेखसंग्रह

मगरी – दोन पायांवर चालणाऱ्या!

Category:

 

मगर ही चार पायांवर चालते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण, दोन पायांवर चालणाऱ्या मगरी तुम्हाला माहीत आहेत का? अशा मगरी अस्तित्वात होत्या. परंतु अलीकडच्या काळात नव्हे, तर अकरा ते बारा कोटी वर्षांपूर्वी – ज्या काळात डायनोसॉरचं राज्य होतं त्याकाळात.

साहित्य - ललित

पालक बालक

Category:

 

मातृत्व ही स्रीची एक नैसर्गिक देणगी आहे. त्यामुळे तिला खूप संयमाने आणि शांत पणे हे सगळे सहन करावे लागते. आणि मी आई होणार आहे म्हणून मलाच सगळ्या गोष्टी करायला लागतात.

व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर

Category:

 

राजा मयेकर यांनी काम केलेले ‘आंधळं दळतंय’, ‘यमराज्यात एक रात्र’,‘असूनी खास घरचा मालक’, ‘बापाचा बाप’, ‘नशीब फुटकं सांधून घ्या’, ‘कोयना स्वयंवर’, ‘श्यामची आई’, ‘धांदलीत धांदल’, ‘भावबंध’, ‘बंबदशाही’, ‘झुंझारराव’ ही त्यांची गाजलेली नाटके.