साहित्य - ललित

निर्मितीचे हात आणि दुरुस्तीचे हात !

Category:

 

सर्जनाला अनेक हात लागतात. कलाकृतीची निर्मिती अनेक हातांपासून संपन्न होते. पण बरेचदा हे निर्मितीचे हात अदृश्य असतात. काहीतरी नवं तयार करणं यासाठी दैवी घटक तर लागतातच पण मानवी मदतही तितकीच गरजेची असते.

साहित्य - ललित

एक था गुल और एक थी

Category:

 

राजेश खन्नाच्या ‘रोटी’ने सर्वत्र रौप्यमहोत्सव साजरे केले. त्याच दरम्यान त्याला एक सहा फुटी लंबू भेटला व ‘परवरिश’ चित्रपटाची निर्मिती झाली या लंबूशी त्याची ‘केमिस्ट्री’ जुळली व पुढील त्याचे सलग आठ चित्रपट, सुपरहिट झाले. तो निर्माता-दिग्दर्शक म्हणजेच, ‘लाॅस्ट ॲ‍ण्ड फाऊंड’ स्टोरीचा हुकमी किमयागार मनमोहन देसाई!!

लेखसंग्रह

महाशिवरात्र

Category:

 

माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र म्हणतात. माघ कृष्ण चतुर्दशी निशीथ कालव्यापिनी असेल तो दिवस महाशिवरात्रीचा मानला जातो. यात निशीथ काल म्हणजे काय याची अनेकांना कल्पना नसेल. रात्रीच्या एकूण वेळेचे १५ समान भाग केले म्हणजे त्यातील प्रत्येक भागाला मुहूर्त असे म्हणतात. त्यातील आठव्या मुहूर्ताला निशीथ असे म्हटले जाते.

लेखसंग्रह

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ९ – शिवप्रिय वृक्ष : रुद्राक्ष

Category:

 

रुद्राक्ष ही भारत, नेपाळ, इंडोनेशिया ( बाली) आणि हिमालयाच्या परिसरातील अन्य प्रदेशात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. रुद्राक्ष हा मिश्र असा संस्कृत शब्द आहे, ज्यात रुद्र (शंकर) आणि अक्ष (“डोळ्यातील अश्रुचे थेंब”) हे सामील आहेत. याला रुधिरवृक्ष असेही म्हणतात. इलोकार्पस जेनिट्रस हे हिमालयाच्या पायथ्याशी गंगेच्या खोऱ्याच्या क्षेत्रात वाढते. तसेच ते दक्षिण पूर्व आशिया, नेपाळ, इंडोनेशिया, न्यू गिनी ते ऑस्ट्रेलिया, आणि हवाईमध्ये सुद्धा आढळते.

कथा

एक परीस स्पर्श (भाग – २३)

Category:

 

आज विजयचा पाय प्रचंड दुखत होता. त्यात मरणाच्या थंडीमुळे अधिकच त्रास होत होता. पायात थोडी सुजही होती. शरीरातील सर्व सांध्यात थोड्या थोड्या वेदना जाणवत होत्या. कशामुळे काय दुखतंय तेच कळत नव्हतं. त्यामुळे विजय लांब पाय करून खुर्चीत बसला होता.

अवर्गिकृत

व्हरक्याच्या मांडवाखालचा गारवा….

Category:

 

घराच्या अंगणात चार डिळ्या (खांब)रोवले जायचे त्याच्यावर उभे आडवे लाकडं बांधून त्यावर पळसाच्या पानांचं दाट आवरण असायचं.. या मांडवाखाली एवढं गार वाटायचं की आमचं सगळं कुटुंब पावसाळ्याची चाहूल लागेपर्यंत तिथेच असायचं.या मांडवावर टाकण्यासाठी पळसाची पानं असायची त्याला आमच्याकडे एक विशिष्ट शब्द होता,त्याला ‘व्हरका’ असं म्हणायचे…

व्यक्ती-परिचय

माजी क्रिकेटपटू करसन घावरी

Category:

 

करसन घावरी हे फास्ट बॉलर असून ते लेफ्ट आर्म स्पिन बॉलिंग ही करत असत. करसन घावरी आपल्या करीयर मध्ये ३९ कसोटी व १९ वनडे खेळले. १९७४ ते १९८१ पर्यत आपल्या क्रिकेट करियर मध्ये दोन वेळा १९७५ व १९७९ वर्ल्ड कप पण खेळले.

व्यक्ती-परिचय

कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती

Category:

 

जयेंद्र सरस्वती हे कांचीपुरम पीठाचे ६९ वे शंकराचार्य होते. ते १९५४ मध्ये शंकराचार्य बनले होते. वेदांवर त्यांचं प्रभुत्व होतं. चंद्रशेखेरेन्द्रा सरस्वती यांनी त्यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं होतं. २००३ मध्ये त्यांना शंकराचार्याची उपाधी घेऊन ५० वर्ष पूर्ण झाली होती.