पैलतीर
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९३८मध्ये त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात चित्रपटांचे पोस्टर करण्यापासून झाली. मेट्रो गोल्डविन मेयर कंपनीची पोस्टरे त्या वेळी अमेरिकेतून येत असत. ही पोस्टरे इथेच तयार करू शकेल अशा भारतीय चित्रकारांच्या शोधात कंपनी होती. त्यासाठी पंडित यांची निवड झाली. या कामासाठी तैलरंगाऐवजी अपारदर्शक जलरंगांचा (पोस्टर कलर) वापर पंडित यांनी सुरू केला. त्यांची कामे ‘मेट्रो’ सिनेमागृहाच्या शोकेसमध्ये झळकू लागली आणि रसिकांचे आकर्षण ठरू लागली. त्यानंतरच भारतामध्ये हिंदी चित्रपटांसाठीची पोस्टर निर्मिती सुरू झाली.
Category:
साहित्य - ललितअचानक वृत्तपत्रात बाळासाहेब मंगेशकर पुण्यातील सरपोतदारांकडे येणार असल्याचा आणि त्यांच्या गीतांवर आधारीत ” मानसीचा चित्रकार तू ” हा कार्यक्रम असल्याचं दिसलं. मला तो “हुंदक्यांचा ओटीपी (One Time Password) ” हातून गमवायचा नव्हता. आयुष्याची पूर्ण ८० वर्षे आई झालेल्या मोठ्या दीदींच्या निधनानंतर भावगंधर्व पहिल्यांदाच बोलणार होते. ओटीपी काही विशिष्ट वेळेसाठी असतो- त्यादिवशी तो दुपारी ४ ते सायंकाळी ८ पर्यंत व्हॅलिड होता.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteडॉ. राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन आणि पुरुषोत्तम त्रिकमदास यांच्यासह अनेक नेत्यांनी गुप्त काँग्रेस रेडिओला मदत केली. रेडिओ प्रसारणाने गांधी आणि भारतातील इतर प्रमुख नेते यांच्याकडून संदेश पाठविला. अधिकार्यांना रोखण्यासाठी,आयोजकांनी स्टेशन जवळजवळ दररोज स्थानांतरित केले. या रेडिओ स्टेशनवरून इंग्रजांनी सेन्सर केलेल्या सगळ्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचविण्यात येत असत. गांधीजींना अटक झालेली आहे, काँग्रेसचे इतर लोक जेलमध्ये आहेत, मेरठमध्ये सैनिकांनी उठाव केला त्यामध्ये 300 सैनिक मारले गेले. अशा अनेक बातम्या त्यावेळी या सिक्रेट रेडिओने लोकांपर्यंत पोहोचवल्या.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअरुण होर्णेकरांनी आजवर ‘दिवा जळू दे सारी रात’सारख्या मेलोड्रामापासून ‘हैदोस’, ‘भोगसम्राट’सारख्या हिट् ॲण्ड हॉट नाटकांपर्यंत.. आणि ‘बेकेट’,‘वेटिंग फॉर गोदो’, ‘गिधाडे’ सारख्या ॲटब्सर्ड, प्रश्नयोगिक, तसंच वास्तववादी नाटकांपासून ते ‘सख्खे शेजारी’सारख्या रेव्ह्यू प्रकारातल्या नाटकांपर्यंत सगळ्या पिंड-प्रकृतीची आणि प्रवृत्तीची नाटकं केली आहेत.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकेचे ह्यांना आपल्या हयातीत १९८४ ला महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार प्राप्त झाला, १९८५ मधे घाटंजी येथील ३७ व्या विदर्भ साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना बहाल झाले. १९९० ला तेल्हारा येथील मराठी प्राध्यापक परिषदेच्या अध्यक्षपदाची यशस्वी धुरा त्यांनी सांभाळली. तसेच केचे हे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे व महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समितीचे सदस्य होते. अमरावती येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते.
Category:
साहित्य - ललितसुनीता माझी धाकटी बहीण. माझ्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी लहान. लहानपणापासून दादा दादा म्हणून सारखी माझ्यामागे असते. आता ती दहावीला आणि मी बारावीला आलो तरी तिला माझ्याशिवाय करमत नाही. भांडेल, रुसेल पण शेवटी सुनीलदादा म्हणून लाडीगोडी करायला येणारच.
माझ्या वडिलांची फिरतीची नोकरी. दर दोन तीन वर्षांनी बदल्या ठरलेल्या. मग नवीन गाव, नवीन शाळा, नवीन मित्र अशी मजा असायची. पण या बदल्यांमुळे आम्हांला मित्र असे फारसे कुणी मिळालेच नाहीत. जरा ओळख होते ना होते तो बाबांची बदली. मग सुनीताला आणि मला आम्हीच एकमेकांना मित्र मैत्रीण, भाऊ-बहीण सगळं शाळेत किंवा घरी, गल्लीत खेळताना तिला कुणी बोललं तर मला खपत नसे. मुळात मी डबल हाडापेराचा. वयाच्या मानानं जरा मोठा दिसणारा. सुनीताची कुणी खोडी काढली तर मी त्याला चांगला बुकलून काढीत असे. सुनीतावर माझे जिवापाड प्रेम आहे.
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकसमुद्रातील लाटांची उंची मोजण्यासाठी वेगवेगळी तंत्रं वापरली जातात. त्यातल्याच एका तंत्रानुसार संवेदक बसवलेल्या बोयऱ्यांचा वापर केला जातो. हा बोयरा म्हणजे पाण्यावर तरंगणारी डब्यासारखी एक वस्तू असते. या बोयऱ्यावरील संवेदक, लाटांमुळे होणाऱ्या बोयऱ्याच्या हालचालींची नोंद करतो. या नोंदींवरून त्या ठिकाणच्या लाटांची उंची कळू शकते. संवेदकानं मिळवलेली माहिती, जागतिक स्थानदर्शक यंत्रणेतील उपग्रहांद्वारे संशोधकांपर्यंत पोचते.
Category:
साहित्य - ललितआजची बालनाट्य मोठी माणसं लिहितात.तेच बसवतात.लहान मुलांना फक्त अभिनय करायचा असतो.तोही अभिनय कसा करावा,हे मोठेच शिकवतात.लहान मुले मोठ्यांची नक्कल करत मोठ्यांचा अभिनय करतात. सर्कशीत प्राण्यांकडून वेगवेगळी कामे करून घेतात.ते बघून प्रेक्षक कौतुकाने टाळ्या वाजवतात….आजचे बालनाट्य हे असेच सर्कशीचा प्रकार आहे.आजच्या बालनाट्यात मुलांचा सहभाग हा कळसूत्री च्या बाहुल्या प्रमाणे आहे.मुलांना बालनाट्याकडे आकर्षित करायचे असेल तर मोठ्यांनी “दरवेशी”च्या भूमिकेतून आधी बाहेर पडायला हवं…
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानकडाऊन करण्याची तीन प्रमुख कारणे होती. पहिले उद्दिष्ट म्हणजे, विषाणूची साखळी तोडणे. साखळी तोडली, तर विषाणूचे पेशीविभाजन रोखले जाईल. दुसरे म्हणजे, बाधित व्यक्तिंमध्ये वाढ झाली, तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तयारी करायला आरोग्य यंत्रणेला अवधी मिळेल आणि तिसरे उद्दिष्ट म्हणजे, मानवी वर्तणुकीवर काम करणे. याचा अर्थ पुरुष, स्त्रिया आणि मुलांना हात धुणे, मास्क घालणे आणि सुरक्षित वावराचे नियम पाळण्याची सवय लावणे.
Copyright © 2025 | Marathisrushti