अप-शकुनी गोमु (गोमुच्या गोष्टी – क्रमांक १६)
Category:
कथा साहित्य - ललितकथेचा मथळा वाचून तुम्हांला नक्कीच माझा राग आला असेल. पण लक्षांत घ्या की मी ह्या गोष्टींमध्ये गोमुच्या बाबतींत घडलेल्या खऱ्या गोष्टींची नोंद करतोय. प्रकाश कलबाडकर हा पत्रकार म्हणून लिहितांना एखाद्या चार आण्याच्या बातमीला बारा आण्याचा मसाला लावतांना दिसेल. कधीतरी संपादकांना खूष ठेवण्यासाठी न घडलेली बातमीही देईल.