केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव अच्युत गोखले
Category:
व्यक्ती-परिचयनागालँडमध्ये त्यांनी पर्यावरण संरक्षण आणि लोक आर्थिक विकासाचा पाया रचला. वन आणि पर्यावरण मंत्रालयात केंद्रीय सचिव म्हणून काम करताना त्यांनी बीटी कॉटनला मान्यता दिली. ते भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्षही होते. ऊर्जा विभागात असताना त्यांनी ‘द एनर्जी रिसोर्स इन्स्टिट्यूट’ची (टेरी) स्थापना केली. निवृत्तीनंतर चेन्नईच्या एम. एस. स्वामिनाथन संशोधन केंद्रात कार्यकारी संचालक म्हणून काम करून, गुणात्मक बदल घडविला. वनस्पतींची छायाचित्रे काढणे, संगीत ऐकणे हे त्यांचे छंद होते.