कथा

गावांची ओढ (कथा)

Category:

 

माणूस भाऊच्या धक्क्यावर उतरो, व्हीटी स्टेशनला उतरो, बॉम्बे सेंट्रलला उतरो, नाही तर सांताक्रुझ विमानतळावर उतरो. त्याच्या पाठीवर त्याच बि-हाड असतं, डोळयात स्वप्नं असतात आणि मनात एक खूणगाठ बांधलेली असते. नाव आणि पैसा मिळवून गावी परत जायचं.

कथा

बिबट्या खेळवणाऱ्याची गोष्ट (संक्षिप्त रूपांतरीत कथा १३)

Category:

 

जॕक लंडन हा प्रसिध्द अमेरिकन कादंबरीकार, कथाकार व सामाजिक विषयांवर लिहिणारा लेखक म्हणून ओळखला जातो. व्यावसायिक नियतकालिकांमधून कथा/कादंबऱ्या मालिका स्वरूपांत लिहिणं व लोकप्रिय करणं ह्याचं श्रेय त्याला जातं. त्याने सेलर (खलाशी) म्हणून कांही वर्षे काम केलं. त्याकाळचा अमेरिकेतला “व्हायोलन्स” अनुभवला. तो आणि जगण्याचा झगडा त्याच्या लिखाणामधे दिसून येतो. त्याने पंधरा सोळा कादंबऱ्या, सुमारे तीनशे कथा व अनेक लेख लिहिले. व्यावसायिक दृष्ट्या लिखाणावर पैसे कमवून श्रीमंत होणारा तो पहिलाच लेखक. दुर्दैवाने तो केवळ चाळीसाव्या वर्षीच मरण पावला. प्रस्तुत गोष्ट त्याच्या इतर लिखाणाहून थोडी वेगळ्या धर्तीची आहे. परंतु तितकीच प्रसिध्द आहे. आपणांस आवडेल अशी अपेक्षा आहे. अभिप्राय जरूर कळवावा.

व्यक्ती-परिचय

पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील आमदार माधुरी मिसाळ

Category:

 

आमदारकीच्या आधी पुणे महापालिकेत २००७ मध्ये महात्मा फुले मंडई या वॉर्डातून नगरसेविका म्हणून त्या प्रथम निवडून आल्या होत्या. त्यानंतर २००९ मध्ये त्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या. २०१४ मध्ये त्या दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झाल्या. तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुणे पर्वती मतदारसंघात माधुरी मिसाळ यांनी विजयी मिळवला.

व्यक्ती-परिचय

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी

Category:

 

मुकेश अंबानी हे गेल्या नऊ वर्षांपासून भारतातील नंबर वनचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असून सध्या त्यांची एकूण संपत्ती २२.७ अब्ज डॉलर इतकी झालेली आहे. मुकेश अंबानींचे वडील धीरूभाई अंबानी यांनी भुलेश्वर चाळमधील छोट्याशा खोलीत आपला बिझनेस सुरु केला होता. मुकेश व अनिल यांचे बालपण देखील याच खोलीत गेले. आज मुकेश अंबानी ‘एंटीलिया’मध्ये राहात असले तरी त्यांना भुलेश्वर चाळीतील घराचा विसर पडलेला नाही. एका इंटरव्ह्यूमध्ये मुकेश अंबानी यांनी भुलेश्वर चाळ व कुलाब्यातील फ्लॅटचा खास उल्लेखही केला होता.मुकेश अंबानींकडे तीन खासगी विमाने आहेत. त्यात ३३० कोटींचे एअरबस ३१९ कॉपरेरेट जेट, ४०१ कोटी रुपयांचे बोइंग बिजनेस जेट-२ आणि ९९ कोटी रुपयांचे मिनी जेट फॉल्कन ९०० ईएक्सचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच डिकी बर्ड
व्यक्ती-परिचय

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच डिकी बर्ड

Category:

 

डिकी बर्ड उजव्या हाताने गोलंदाजी करत असत. ते राईट आर्म ऑफ ब्रेक गोलंदाज होते. १९५६-५९ यॉर्कशायर कडून ते पहिला प्रथम श्रेणीचा सामना खेळले. १२ ऑगस्ट १९६४ रोजी अखेरचा प्रथम श्रेणी सामना खेळले. १९७० मध्ये अंपायर म्हणून त्यांनी आपले करिअर सुरु केले. डिकी बर्ड हे क्रिकेटचा एवढ्या वर्षांचा काळ बघितलेला एकमेव जिवंत माणूस असावेत.

व्यक्ती-परिचय

वन्यजीव संवर्धक जिम कॉर्बेट

Category:

 

एखादा वाघ किंवा बिबट्या नरभक्षक आहे, याची खात्री पटल्याशिवाय ते त्याला ठार करत नसत. ४३६ लोकांचा बळी घेणारा या भागातला पहिला नरभक्षक वाघ ‘चंपावत’ याला कॉर्बेट यांनी ठार केले. तिथून नरभक्षक वाघांना ठार करण्याची त्यांची मोहीम सुरू झाली. दोन नरभक्षी बिबट्यांचीही त्यांनी शिकार केली. या नरभक्षक वाघांच्या शिकारी ते एकटेच करत. फक्त रॉबिन हा त्यांचा कुत्रा त्यांच्या सोबत असे.

लेखसंग्रह

दुर्ग-मंदिर-तलावांचे शहर – ठाणे

Category:

 

शिलाहार व बिंब राजवटीत ठाण्यात साठ मंदिरे व साठ तलाव बांधण्यात आले होते. पण पोर्तुगीजांनी ही सर्व मंदिरे जमीनदोस्त केली. आज इमारतीचा पाया खोदताना या मंदिरांचे अवशेष, कोरीव स्तंभ, वा मूर्तीच्या स्वरूपात पहावयास मिळतात. तलाव साफ करतानाही काही अप्रतिम मूर्ती मिळाल्या आहेत.

व्यक्ती-परिचय

टेनिस चाहत्यांच्या मनात घर करणारी रशियन ब्यूटी मारिया शारापोव्हा

Category:

 

२००४ मध्ये विम्बल्डन जिंकल्यानंतर मारिया शारापोवाने २००८ मध्ये अमेरिकन ओपन आणि २०१० मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकल्या. मग २०१२ आणि २०१४ मध्ये फ्रेंच स्पर्धा जिंकून तिने विविध कोर्टवरील बहुपैलुत्व सिद्ध केले. सेरेना किंवा व्हीनसच्या तुलनेत तिने फार ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या नाहीत. मात्र, मारिया शारापोवा केवळ एक प्रसिद्ध टेनिसपटू नाही. ती आता जगातील एक अव्वल सेलेब्रिटीही बनलेली आहे.

व्यक्ती-परिचय

बालशिक्षणाची माता ताराबाई मोडक

Category:

 

१९२६ साली नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत त्यांनी शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले.या संस्थेने पुढे पूर्व प्राथमिक अध्यापन मंदिर सुरु केले. यातून मराठी आणि गुजराती दोन्ही भाषांच्या हजाराहून अधिक शिक्षक शिक्षकांचे प्रशिक्षण केले. मराठी शिक्षणपत्रिका त्यांनीच सुरु केली.ताराबाईनी १९३३ जूनचा शिक्षणपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित केला.