मानवी वंशवृक्षाची पाळंमुळं
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकप्रत्येक सजीवाला त्याचे गुणधर्म हे त्याच्या पेशींतील जनुकांच्या रचनेनुसार प्राप्त होतात. जनुक म्हणजे सजीवाच्या पेशीतल्या डीएनए रेणूंतल्या विशिष्ट रासायनिक रचना. पेशींतील जनुकांच्या संपूर्ण माहितीला, सजीवाचा ‘जनुकीय आराखडा’ म्हटलं जातं. सजीवाच्या जनुकीय आराखड्यात विविध कारणांनी कालानुरूप बदल होत जातात. हे जनुकीय बदल त्या सजीवाच्या स्वरूपात बदल घडवून, त्या सजीवाच्या उत्क्रांतीला कारणीभूत ठरतात. आज अस्तित्वात असलेल्या सजीवांच्या जनुकीय आराखड्यांची प्राचीन काळातील सजीवांच्या जनुकीय आराखड्यांशी तुलना करून त्या सजीवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास करता येतो.