व्यक्ती-परिचय

आरती अंकलीकर-टिकेकर

Category:

 

आरती अंकलीकर-टिकेकर यांनी आग्रा-ग्वाल्हेर घराण्याच्या पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे आणि नंतर गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याकडे संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९६३ रोजी झाला.त्यांच्या गायनशैलीवर त्यांच्या दोन्ही गुरुंचा प्रभाव जाणवतो. चांगलं गाता येण्यासाठी नैसर्गिक देणगी, संस्कार, कष्ट (रियाज) आणि संधी या चार गोष्टींची गरज असते.

व्यक्ती-परिचय

आर. के. लक्ष्मण

Category:

 

रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्रातून काढलेली व्यंगचित्रे खूप गाजली होती. ‘कॉमन मॅन’ या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून त्यांनी भोवतालच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींवर मार्मिक भाष्य केले होते. कॉमन मॅन हे त्यांचे गाजलेले व्यंगचित्र.

व्यक्ती-परिचय

कमलाकर सोनटक्के

Category:

 

थोड्याच दिवसात सोनटक्केनी अल्काझींचे मन जिंकले. व ते त्यांचा जणू उजवा हातच बनले. अल्काझींच्या प्रत्येक कामात त्यांना सोनटक्केंचा सहवास भासु लागला. पहिल्याच वर्षी त्यांच्या ‘अंधायुग’ या निर्मितीचे स्क्रिप्ट इनचार्ज म्हणून त्यांनी काम पाहीले. अल्काझींच्या कामाची ताकद त्यांना जाणवत होती. एकदा तर पंतप्रधानांची कांही मिनिटासाठी असलेली भेट, त्यांनी संपूर्ण शो पाहून गेल्याची त्यांची आठवण होती.

साहित्य - ललित

प्रतिकृती (कथा)-भाग-६

Category:

 

साधारण दहा-पंधरा मिनिटांचा अवधी गेला असावा. कुपीच्या तळाशी पायांची बोटं पूर्ण वाढलेली दिसू लागली. हळूहळू सगळं पाऊल आणि नंतर वरवर वाढत वाढत गुडघ्यापर्यंत पूर्ण पाय! मग वरवर जात जात मांड्या, कंबर पोट, हात, छाती असा क्रमाक्रमाने संपूर्ण आमदार प्रकट झाला! ही प्रक्रिया सुमारे सहा तास चालली होती. पण आम्हाला त्याची अजिबात जाणीव झाली नाही! ते अद्भुत दृश्य कल्पनेपेक्षाही अचाट होतं. आमदाराची आकृती पूर्ण होताच मी दादाचा हात हातात घेतला आणि झटकन ओढून त्याला उठवलं. आम्ही घाईघाईने बाजूला लावलेल्या पडद्यामागे गेलो. दादाला तिथे उभं करून मी अत्यंत काळजीपूर्वक परंतु त्वरेने कुपी काढून घेतली. कुपीसाठी अत्यंत हलकं पण पारदर्शक काचेसारखं आवरण बनवलं हेतं. त्याची घडी करून ते बाजूला ठेवून दिलं. आता आमदारसाहेब डोळे मिटलेल्या अवस्थेत तिथे उभे होते! कुठल्याही क्षणी ते डोळे उघडतील, त्यापूर्वी मला पडद्यामागे जाणं भाग होतं.

लेखसंग्रह

विठ्ठला कोणता झेंडा, घेऊ हाती !

Category:

 

हे कलियुग आहे कलीचा वाऱ्याप्रमाणे ही माणसे वागतात पण सत्य कुठे लपत नाही संत थोर होत त्यांचे विचार आचार वेगळी होत आता या जनतेने कसे वागावे हे तुम्हीच ठरवा यू हवे हल्ली सगळीकडे वातावरण फार वाईट आहे जग बुडी ची वेळ आली आहे इथून पुढच्या काळात तरी प्रत्येकाने सगळ वागावे यातच भलेपणाचा आहे. माणसासारखे वागा माणूस म्हणून जागा आपलं सर्वांना म्हणा

व्यक्ती-परिचय

कमलाकर तोरणे

Category:

 

भालजी पेंढारकर हे त्यांचे गुरू. ‘महारथी कर्ण’ या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता. ‘हिरवा चुडा’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट.

व्यक्ती-परिचय

काशिनाथ सखाराम (बंडोपंत देवल)

Category:

 

काशिनाथ सखाराम ऊर्फ बंडोपंत देवल हे या सर्कसचे एक मालक भारतातील सर्वोत्कृष्ट विदूषक म्हणून ख्यातकीर्त होते. ‘द बेस्ट क्लाउन इन इंडियन सर्कस’ म्हणून त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवली.

व्यक्ती-परिचय

ओमी वैद्य

Category:

 

अरेस्टेड डेव्हलपमेंट, द ऑफिस, दिल तो बच्चा है जी, देसी बॉईज यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये ओमीने उत्कृष्ट भूमिका साकारल्या.