No Picture
साहित्य - ललित

ओवणे, पटवणे, गाठवणे

Category:

 

मंगळसूत्र मण्यांच्या आकारानुसार दोर वळली जायची. दोन पदरी साठी चार दोऱ्या व लांबी पण ठरलेली. पायाच्या पिढंरीवर पाणी लावून दोर वळली की मग चारपदरी दोर आणि ते सगळे एकत्रित करून दोन सोन्याचे मणी नंतर दोन सोन्याच्या वाट्या मध्ये एक मणी परत दोन वाट्या असे ओवून झाले की मग तीन पदर पायाच्या अंगठ्याला पीळ देऊन अडकवून एक पदरी दोऱ्या काळे मणी ओवून मग असे आळीपाळीने चार पदर ओवून झाले की देवा समोर पाट मांडून घरातील एखाद्या मोठय़ा सवाष्णी कडून त्या मंगळसूत्राला हळदीकुंकू लावून बांधून घेवून झाले की देवाच्या व त्या बाईच्या पाया पडायला लागायचे.

No Picture
व्यक्ती-परिचय

महेश मांजरेकर

Category:

 

महेश मांजरेकर यांनी लेखन व भुमिका केलेला ’मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ हा मराठी चित्रपट तुफान गाजला. त्यानंतर त्यांनी ”शिक्षणाच्या आईचा घो”, ”लालबाग परळ”, ”फक्त लढ म्हणा”, ”काकस्पर्श” आणि ”कोकणस्थ” या चित्रपटांचे दिग्दर्शन करून मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्याची महत्वाची कामगिरी केली.

No Picture
साहित्य - ललित

अ. भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखेचा प्रवाह

Category:

 

ठाण्यातील समाजातून वेगवेगळे कलाकार निर्माण झाले पाहिजेत हीच जिगिषा, तळमळ मनांत ठेवून वि. रा. परांजपे व सन्मित्रकार स. पां. जोशी या द्वयींनी पुढाकार घेऊन अ.भा.म.ना. परिषद, ठाणे शाखेची स्थापना १ ऑक्टोबर १९७९ रोजी केली. तो विजया दशमीचा शुभ दिवस होता.

No Picture
साहित्य - ललित

कादंबरी ते नाटककार एक प्रवास

Category:

 

खरं म्हणजे ते अभिनयाच्या क्षेत्रात आले असते तर त्यांनी धमाल उडवली असती. सावळाच पण देखणा चेहरा, गांभीर्य आणि स्मितहास्य याचं त्या चेहऱ्यावर विलसणारं मिस्कील अजब मिश्रण, संपूर्ण व्यक्तिमत्त्वात असलेली ऋजु उत्कटता आणि ती पेलण्याचं सामर्थ्य असलेला आंतरिक कणखरपणा.

No Picture
व्यक्ती-परिचय

महेश काळे

Category:

 

कुठल्याही प्रकारांतलं गाणं असो, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत, गजल, कव्वाली किंवा एखादं पाश्चिमात्य गाणे प्रत्येक प्रकार संपूर्ण ताकदीने, तो ऊर्जेने परिपूर्ण असतो.

No Picture
व्यक्ती-परिचय

महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड (तिसरे)

Category:

 

२८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजी रावांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या.

No Picture
साहित्य - ललित

स्वर प्रवासातील पुढचे पाऊल

Category:

 

या दोन-तीन महिन्यानंतर मी गाण्याचे काम पुन्हा सुरू केले. विवेक देशपांडे यांच्या ‘निष्पाप’ या मराठी चित्रपटासाठी विश्वास पाटणकर यांच्या संगीत दिग्दर्शनामध्ये मृदुला दाढे-जोशी बरोबर एक द्वंद्वगीत मी रेकॉर्ड केले. याचवेळी विश्वास पाटणकर यांचा मुलगा मिथिलेश पाटणकर याने कवी ग्रेस यांच्या गाण्याला त्याने बांधलेली अतिशय सुंदर चाल ऐकवली. मिथिलेश त्यावेळी शाळेत होता. सातवी-आठवीत असेल. पण उत्तम संगीतकाराचे गुण वडिलांकडून जन्मजातच त्याने घेतले होते

No Picture
साहित्य - ललित

स्वर प्रवासातील पुढचे पाऊल

Category:

 

या दोन-तीन महिन्यानंतर मी गाण्याचे काम पुन्हा सुरू केले. विवेक देशपांडे यांच्या ‘निष्पाप’ या मराठी चित्रपटासाठी विश्वास पाटणकर यांच्या संगीत दिग्दर्शनामध्ये मृदुला दाढे-जोशी बरोबर एक द्वंद्वगीत मी रेकॉर्ड केले. याचवेळी विश्वास पाटणकर यांचा मुलगा मिथिलेश पाटणकर याने कवी ग्रेस यांच्या गाण्याला त्याने बांधलेली अतिशय सुंदर चाल ऐकवली. मिथिलेश त्यावेळी शाळेत होता. सातवी-आठवीत असेल. पण उत्तम संगीतकाराचे गुण वडिलांकडून जन्मजातच त्याने घेतले होते

No Picture
व्यक्ती-परिचय

मल्हार सदाशिव (बाबूराव) पारखे

Category:

 

बाबूराव पारखे यांनी ‘राम यशोगाथा’ हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात पारखे यांनी, ज्या भृगूत्तमांना वैदिक वाङ्‌मयात अथर्वाण म्हटले आहे, त्या भार्गवांचा प्रभाव ॲसीरिया, बॅबिलोनिया, सुमेरिया, ॲनाटोलिया, मिसर या प्रदेशांतही असल्याचे म्हटले होते.