अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – २८ – प्रितीलता वड्डेदार

Category:

 

१९३२ साली पाहाडतळी युरोपियन क्लब वर हल्ला करण्याची योजना सूर्य सेन ह्यांनी केली आणि ह्याची जवाबदारी प्रितीलता ह्यांच्यावर सोपवली. हाच तो क्लब जिथे बाहेर पाटी होती, “Indians and dogs are not allowed”. २४ सप्टेंबर च्या रात्री १०.४५ मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली. प्रितीलता एका पंजाबी युवक बनून गेल्या,तर त्यांचे इतर साथीदार वेगळ्या वेषात क्लब जवळ पोचले. आतमध्ये ४० इंग्रज उपस्थित होते. बॉम्ब ने हल्ला करण्यात आला. गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात एक व्यक्ती मारला गेला तर अर्ध्याच्या वर जखमी झाले. प्रितीलता आणि त्यांचे साथीदार तिकडून बाहेर पडले, पण इंग्रजांनी दिलेल्या प्रतिउत्तरात प्रितीलता ह्यांच्या पायाला गोळी लागली, त्या पळण्यास असमर्थ ठरल्या. इंग्रजांच्या हाती पकडल्या जाण्यापेक्षा त्यांनी मरण पत्करले. पोटॅशियम सायनाईड खाऊन त्यांनी आपले जीवन देशाच्या चरणी अर्पण केले.

  July 19, 2022


दिनविशेष

अमेरिकेचा नॅशनल आइसक्रीम दिवस

Category:

 

इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याच्या जेवणानंतरच्या डेझर्ट डिशमध्ये आइसक्रीमचा समावेश हमखास असायचा. पण तो या पदार्थाबाबतीत इतका दक्ष होता की या ‘फ्रोजन स्नो’ची माहिती कुणालाही कळू नये यासाठी त्याने आपल्या शेफला ही पाककृती लपवून ठेवण्याकरता आयुष्यभर पेन्शनची सोय केली होती असं म्हणतात.

  July 19, 2022


व्यक्ती-परिचय

मोहनदास सुखटणकर

Category:

 

म्हापशाच्या ‘सारस्वत विद्यालय’ या मराठी शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असताना त्यांनी पहिल्यांदाच एका छोटया नाटुकलीत काम केले. त्या नाटुकलीचे नाव होते, ‘खोडकर बंडू’.

  July 19, 2022


व्यक्ती-परिचय

मोहन वाघ

Category:

 

मोहन वाघांनी तब्बल ८३ नाटकांची निर्मिती केली. त्यांचे १५,६४७ एवढे प्रयोग केले, पण त्यांची फक्त १५ नाटकंच व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी ठरली. तरीही प्रत्येक कलाकाराला प्रयोगानंतर पाकीट द्यायलाच हवं, आजचं पाकीट उद्या द्यायचं नाही, हा त्यांचा नियम होता.

  July 19, 2022


व्यक्ती-परिचय

मोहन दाते

Category:

 

१९९५ साली धुंडीराजशास्त्रींचे निधन झाल्यानंतर ‘दाते पंचांग’ चालविण्याची जबाबदारी मोहनराव दाते यांच्यावर पडली. तेव्हापासून आतापर्यंत मोहनराव ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत हे दाते पंचांगाच्या लोकप्रियतेवरून दिसून येतच आहे.

  July 19, 2022


साहित्य - ललित

गझल रेकॉर्डिंग आणि ४०० वा कार्यक्रम

Category:

 

या संपूर्ण काळात पं. विनायकरावजी काळे आणि श्रीकांत ठाकरे गाण्याचे शिक्षण या गुरुंकडे माझे सुरूच होते. माझ्या गझल गायकीतील प्रगतीबद्दल श्रीकांतजी खूष होते.

  July 19, 2022