व्यक्ती-परिचय

दिग्दर्शक यशवंत पेठकर

Category:

 

पेठकरांच्या कामाच्या पद्धतीवर खूश होऊन मुंबईच्या प्रकाश पिक्चर्सच्या विजय भट्ट यांनी पेठकरांना मोठा मोबदला देऊन मुंबईला आणले व ‘शादी की रात’ हा हिंदी चित्रपट त्यांच्या हातात दिला. त्यात गीता बाली, रेहमान, अरुण यांसारखे आघाडीचे कलाकार होते. सुधीर फडके यांनी त्यांना ‘रत्नधर’ हा आपला चित्रपट दिला. चित्रपट उत्कृष्ट जमला होता, पण भागीदारांच्या भांडणामुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही. ‘अपराधी’चा नायक असणाऱ्या राम सिंग यांनी पेठकरांना ‘सौ का नोट’ हा आपला चित्रपट दिग्दर्शनासाठी दिला. त्यात गीता बाली, करण दिवाण, बेगमपारा हे कलाकार होते.

  April 28, 2022


व्यक्ती-परिचय

शास्त्रीय उपशास्त्रीय गायक शौनक अभिषेकी

Category:

 

भारतातील सर्व संगीत महोत्सवासह भारताबाहेर यूरोप, अमेरिका, इग्लंड, ऑस्ट्रेलिया, द दक्षिण अफ्रीका, रशिया, चीन आदी देशांमध्ये आपली कला सादर करुन रसिकांची वाहवाही मिळवली आहे. भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताचे फ्युजन करण्याचे अनेक प्रयोग इतर भार परदेशी कलाकारांच्या साथीने ‘Vibgyor’,’ताल यात्रा’, ‘साउंड ऑफ इंडिया ‘माईल्स फ्रॉम इंडिया’ अशा कार्यक्रमातून सादर करून त्यांनी संगीत क्षेत्रातील ही वेगळी वाट सुद्धा समर्थपणे हाती आहे जी रसिकांच्या पसंतीस उतरली आहे.

  April 28, 2022


व्यक्ती-परिचय

कॉश्च्युम डिझायनर भानु अथैया

Category:

 

त्यांना लहानपणापासूनच गांधीजींचे रेखाचित्र काढण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळेच त्यांना रिचर्ड ॲ‍टनबरो यांच्या ‘गांधी’ (१९८२) या आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी कॉश्चूम डिझाईन करण्याची संधी मिळाली. देशाला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू अथय्या यांचा ऑस्कर प्रवास थक्क करणारा होता.

  April 28, 2022


व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ गायक पं. राजाभाऊ कोगजे

Category:

 

उल्हास कशाळकर, अजय पोहनकर, आशा खाडिलकर आणि इतर कलाकारांचे ते गुरू होत. नागपूर महानगरपालिकेने नागपूरच्या गोकुळ पेठेमध्ये रहात असलेल्या रस्त्यास त्यांचे नाव दिले आहे.

  April 28, 2022


दिनविशेष

एअर बस ए ३८० सिंगापूर एअरलाइन्स या विमानाचे प्रथम प्रवासी उड्डाण

Category:

 

चार इंजिने असलेले हे विमान ५२५ ते ८५३ प्रवाशांना १५,७०० कि.मी. पर्यंत नेऊ शकते. म्हणजेच हे विमान डॅलस ते सिडनी दरम्यान विनाथांबा जाऊ शकते. एअरबस ए ३८० चे पहिले उड्डाण २७ एप्रिल २००५ रोजी पार पडले तर ह्या विमानाची पहिली प्रवासी सेवा सिंगापूर एअरलाइन्सने २५ ऑक्टोबर २००७ सुरु केली.

  April 27, 2022


व्यक्ती-परिचय

बार्बीडॉलची निर्माती रुथ हँडलर

Category:

 

खेळण्यांच्या दुनियेत दीर्घकाळ दबदबा असलेली आणि आबालवृद्धांना आजही मोहिनी घालणारी बार्बी बाहुली साठ वर्षांची झाली. सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्यांची अतिशय कमनीय बांध्याची ही बार्बी आजही बाहुली साम्राज्यातील सम्राज्ञी मानली जाते. या काळात तिची अनेक रूपे सामोरी आली. गोरीपान पासून काळी कुट्ट अश्या विविध वर्णात ती दिसली असली तरी आजही सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्याची तिची प्रतिमाच अधिक लोकप्रिय आहे.

  April 27, 2022