व्यक्ती-परिचय

चितळे उद्योगसमुहाचे युवा मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रनील चितळे

Category:

 

चितळे ग्रुपचा अवघ्या ३१ वर्षांचा तरुण सी.ई.ओ. इंद्रनील गेली दहा वर्षे या ग्रुपचा कारभार पाहत आहे. चव, दर्जा आणि विश्वास या त्रिसूत्रीला पुढे नेत त्यात स्वतःच्या इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट स्किल्सची भर टाकून त्याने आपल्या एक दशकाच्या कारकिर्दीतील ग्रुपची उलाढाल (टर्नओव्हर) दुपटीहून अधिक वाढवली, शिवाय खाद्य पदार्थ टिकवण्याच्या क्षेत्रात नवनवे प्रयोग करून पुण्याची बाकरवडी अमेरिकेत पोहोचवली आणि वर्ष-वर्ष टिकवली.

  April 28, 2022


कथा

निर्णय (कथा)

Category:

 

खिडकीतून नजरेस पडणारी सूर्याची लालबुंद चकती एव्हाना क्षितिजाआड लुप्त झाली होती. आकाशात चंद्राची चंद्रकोर डोकं वर काढीत होती. ताऱ्यांचा अंधूक प्रकाश धुक्यातून वाट काढीत आल्यासारखा वाटत होता. कातरवेळेने परिसराचा कब्जा घेतला होता. तोच दरवाजाची बेल वाजली. मम्मीने दार उघडलं. महेश कामावरून परतला होता. येतायेताच त्याने विचारलं, “रुबी कुठाय?”

  April 28, 2022


व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ निर्माता शेखर ताम्हाणे

Category:

 

सविता दामोदर परांजपे’, ‘तू फक्त हो म्हण’, ‘नकळत सारे घडले’ या सारखी नाटके शेखर ताम्हाणे यांनी लिहिली. तसेच त्यांनी ‘कलकी’, ‘ट्रॅक’ यासारख्या गाजलेल्या मालिकाचे लेखन केले होते.त्यांची ‘आगंतुक’ कादंबरीचा पण गाजली होती.

  April 28, 2022


लेखसंग्रह

महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळ – दशा आणि दिशा

Category:

 

मराठी वाङ्मय मंडळ हे विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्य आणि संस्कृतिविषयी प्रेम निर्माण करणारे एक सशक्त साधन आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाङ्मयीन अभिरुची निर्माण करणे, या अभिरुचीला वाङ्मयीन जडण-घडण करण्याचे फार मोठे सामर्थ्य वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमात असते. पण सर्वच महाविद्यालयांत हे कार्य घडताना दिसत नाही. त्यामागे वेगवेगळी कारणे आहेत.

  April 28, 2022


व्यक्ती-परिचय

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक

Category:

 

१९९७ साली सरनाईक राष्ट्रवादीचे सदस्य झाले आणि त्यांनी सक्रीय राजकरणामध्ये उडी घेतली. ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरातून ते तीन वेळा पालिकेवर निवडून गेले होते. २००८ मध्ये त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. लगेचच २००९ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून तिकीट मिळाले आणि ते ठाण्यातून आमदार झाले.

  April 28, 2022


लेखसंग्रह

मोठ्यांचा चरण स्पर्श

Category:

 

आपले आई वडील आपल्याला जो आशीर्वाद देतात त्या सारख अमूल्य ह्या जगात काहीही नाही. त्यांच्या पावलांना स्पर्श करण्यात जो आनंद असतो तो कशातही नसतो. आई चे उपकार तर कधीही न विसरण्या सारखे असतात. आपला जन्म म्हणजे तिचा सुद्धा दुसरा जन्म असतो, एवढ्या मरण यातना तिला सहन कराव्या लागतात.

  April 28, 2022


व्यक्ती-परिचय

मराठी साहित्यिक वसंत नरहर फेणे

Category:

 

फेणे यांनी प्रामुख्याने कथा आणि कादंबरी या साहित्यप्रकारांमध्ये अधिक लेखन केले आहे. सर्वसामान्य माणसाचे अनुभवविश्व प्रत्ययकारक रीतीने या लेखनातून प्रकट होते. व्यक्तीपेक्षा समूहाला केंद्रस्थानी ठेवणारे हे लेखन मराठी साहित्यामधील प्रवृत्तीप्रवाहांच्या पलीकडे वावरणारे आहे. त्यांच्या महत्त्वाच्या पुस्तकांमध्ये सेंट्रल बस स्टेशन, सहस्रचंद्रदर्शन, विश्वंभरे बोलविले या कादंबऱ्या तसेच देशांतर कथा, ध्वजा, हे झाड जगावेगळे, ज्याचा त्याचा क्रूस, मावळतीचे मृद्गंध, निर्वासित नाती, पहिला अध्याय, पाणसावल्यांची वसाहत, शतकान्तिका या कथासंग्रहांचा समावेश आहे.

  April 28, 2022


व्यक्ती-परिचय

माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले

Category:

 

माधव गोडबोले हे एक सचोटीचे, कर्तव्यदक्ष, नियमानुसार काम करणारे सनदी अधिकारी होते.. पक्के सेक्युलर पण सनदशीर लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. गृहसचिव म्हणून निवृत्त व्हावे लागल्यावर ‘द अनफिनिश्ड इनिंग्ज ‘ हे त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक चांगलेच गाजले.

  April 28, 2022


दिनविशेष

अजिंठ्याची लेणी लोकांच्या दृष्टिपथात आणली गेल्याची 203 वर्षे

Category:

 

१८२२ मध्ये सर विल्यम एर्स्किन यांनी आपल्या लेखनात जॉन स्मिथ दैनंदिनी ईस्ट इंडिया कंपनीचे निर्देशनासह अजिंठा लेणी स्थापत्य, शिल्प व चित्रांची चर्चा केली आहे. इसवी सन पूर्व २०० च्या सुमाराला लेणी खोदण्यास सुरुवात झाली होती. पैठणच्या सातवाहन घराण्यातील सम्राटानी याची सुरुवात केली. सातवाहन काळात ८, ९, १०,१२, १३ आणि १५ या लेण्यांचे खोदकाम पूर्ण झाले. पुढे जवळपास ५०० वर्षे खोदकाम बंद होते त्यानंतर पुन्हा पाचव्या शतकात गुप्त , वाकाटक आणि बदामीच्या चालुक्यांनी येथील लेण्यांचे खोदकाम सुरु केले.

  April 28, 2022