No Picture
व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ हार्मोनिअम वादक, गायक विठ्ठल रामचंद्र सरदेशमुख

Category:

 

उत्तम दर्जाचे हार्मोनिअम संगतकार म्हणूनही त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले होते. सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे, गंगूबाई हनगल व भीमसेन जोशी अशा किराणा घराण्याच्या गायकांना विठ्ठलरावांनी समरसून साथ केलीच, शिवाय कुमार गंधर्व, सिद्धेश्वरी देवी, अझमत हुसेन खाँ, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर अशा ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर घराण्याच्या कलाकारांनाही ते तेवढीच रोचक संगत करत असत.

No Picture
व्यक्ती-परिचय

माजी राज्यसभा खासदार भारतकुमार राऊत

Category:

 

भारतकुमार राऊत हे पत्रकार आणि ललित लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच वृत्तपत्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि पुढे मुंबई सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, दी इव्हिनिंग न्यूज ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल, दी इंडियन पोस्ट, दी इंडिपेंडंट, दी मेट्रोपोलिस ऑन सॅटर्डे, दी पायोनियर अशा मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रांमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या.

No Picture
कथा

जादूचे दुकान (संक्षिप्त रूपांतरीत कथा ९)

Category:

 

एच. जी. वेल्स हे वैज्ञानिक वाडमय लिहिणारे लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. टाईम मशीन ही त्यांची कादंबरी खूप गाजली. तिच्या कल्पनेवर चित्रपट निर्माण झाले. इनव्हीजिबल मॅन ही देखील तितकीच गाजलेली कादंबरी. ‘फर्स्ट मेन ऑन द मून’ आणि इतर वैज्ञानिक कथांमधून त्यांनी जणू कांही भविष्याचा वेधच घेतला. त्यांनी कल्पिलेल्या अनेक गोष्टी पुढे वास्तवांत आल्या. त्यांनी जगाचा इतिहासही लिहिला आणि आदर्श जग कसं असावं ह्याच्या कल्पनाही कथा कादंबऱ्यांतून मांडल्या. त्यांच्या अनेक कथाही लोकप्रिय झाल्या. ब्लाईंड मॅन, व्हॅली ऑफ स्पायडर, इ. कथांमधे कल्पना विलास तर आहेच पण बरोबरच शिकवण पण आहे. मॅजिक शॉप ही त्यांची जरा वेगळीच कथा. ह्या कथेत तर्कसंगत विचार करू पहाणाऱ्या बापाचा जादूवरला अविश्वास किंवा जादू म्हणजे युक्ती असे मत आणि त्याच्या लहान मुलाचा जादूवरला संपूर्ण विश्वास ह्या विरोधाभासावर कथा आधारीत आहे. बापाला आलेला अनुभव तर्कसंगत वाटत नाही. तो अजूनही त्यावर विश्वास ठेवू इच्छित नाही. त्याच्या तर्कनिष्ठेला धक्का तर बसलाय पण ते त्याला गैर वाटतय. मुलगा तेच सत्य म्हणून सहज स्वीकारतो. जेवढं आणि जसं आपण पहातो तसंच दुसरा पहात नाही. त्याची जाणीव वेगळ्या पातळीवरची असू शकते. ह्यात योग्य, अयोग्य कांही नाही.
पण आपली जाणीवच खरी व दुसऱ्याची चुकीची असा दुराग्रह असू नये. गोष्टीत जादूकडे वेगळ्या दृष्टीने पहाणारा लहान मुलगा त्याचाच असतो, म्हणून तो ते सहज स्वीकारतो, इतकेच.

No Picture
व्यक्ती-परिचय

क्रिकेटपटू जॉन विस्डेन

Category:

 

विस्डेन हा इंग्लंडच्या दक्षिणेकडच्या ब्रायटन नावाच्या समुद्रकिनाऱ्यानजीकच्या सुंदर भागात राहायचा. विस्डेनची फलंदाजी बऱ्यापैकी चांगली असली तरी तो प्रामुख्यानं गोलंदाज म्हणूनच गाजला. पण दुर्दैवानं विस्डेनच्या कामगिरीचे अनेक तपशील नष्ट झाले असल्यामुळे त्याविषयी फारसं माहीत नाही. त्यातून वाचलेल्या माहितीनुसार लॉड्सवर दोन वेगवेगळ्या सामन्यांच्या दोन्ही डावांमध्ये विस्डेननं सुरुवातीपासून शेवटपर्यंत न थकता गोलंदाजी टाकली होती. तसंच अमेरिकेमध्ये एकदा त्यानं ६ चेंडूंमध्ये ६ बळी घेतले होते.

No Picture
व्यक्ती-परिचय

नाट्यनिर्माते संतोष कोचरेकर

Category:

 

संतोष, कसेही कर आणि एक गाढव घेऊन ये’… वडिल नाना कोचरेकर (नारायण धर्माजी कोचरेकर) यांनी फर्मान सोडले. संतोष कोचरेकर यांनी आजुबाजूला खूप शोधाशोध केली आणि कसेबसे एका माणसाकडून गाढव भाड्याने मिळवले. नानांनी त्या गाढवाला बाशिंग बांधले, मुंडावळ्या बांधल्या. सोबत वाजंत्री घेतली. माइक संतोष यांच्या हातात होता. ‘आज रात्रौ थिएटरमध्ये बघायला या, गाढवाचं लग्न. आहेराचा दर ३ रुपये, २ रुपये’. मालवणमधील लोक टकामका पाहू लागले. युक्ती सफल झाली आणि संध्याकाळी नाटकाचा प्रयोग हाऊसफुल्ल झाला.

No Picture
लेखसंग्रह

तीन शतकांपूर्वीची पत्रं

Category:

 

या विविध पत्रांतील मजकूर तसंच पत्रांचं स्वरूप, पत्रांच्या घड्यांची पद्धत, या सर्वच गोष्टी इतिहासकारांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. कारण हा सतराव्या शतकातला काळ युरोपातला अस्थिरतेचा काळ होता. या पत्रांतून त्याकाळच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला जाणार आहे.

No Picture
व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ कवयित्री व लेखिका अनुराधा पाटील

Category:

 

गेली जवळपास पन्नास वर्षे त्या व्रतस्थपणे कविता लिहितायत. या पन्नास वर्षांत त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित झाले आहे. ‘दिगंत’ (१९८१), ‘तरीही’(१९८५), ‘दिवसेंदिवस’(१९९२), ‘वाळूच्या पात्रांत मांडलेला खेळ’(२००५) आणि ‘कदाचित अजूनही’(२०१७). या संग्रहांतून प्रामुख्याने आत्मपर कविता आलेली आहे. या कवितेचा केंद्रबिंदू विशेषत्वाने स्त्रीच राहिलेली आहे.

No Picture
व्यक्ती-परिचय

बडोद्याचे महाराज फतेहसिंग प्रतापराव गायकवाड

Category:

 

रणजी स्पर्धेत खेळणारे लोकसभेचे ते एकमेव खासदार होते. फतेहसिंग गायकवाड हे १९५७ ते १९६२, १९६२ ते १९६७, १९७१ ते १९७७ व १९७७ ते १९८० पर्यत कांग्रेस पक्षाचे बडोद्याचे सांसद होते. भारतातील टीव्हीवर समालोचन करण्याचा पहिला मानही त्यांना जातो.