व्यक्ती-परिचय

अभिनेता मनोज बाजपेयी

Category:

 

मनोज बाजपेयी यांनी आपल्या करिअर ची सुरवात दूरदर्शन वर प्रसारित होणाऱ्या ‘स्वाभिमान’ या मालिकेपासून केली. ह्या मालिकेत मनोज बाजपेयी यांच्या बरोबर आशुतोष राणा आणि रोहित रॉय यांच्यामुळे त्यांचीही मालिका सुपरहिट ठरली. बैंडिट क्वीन या चित्रपटापासून त्यांनी बॉलीवुड मध्ये प्रवेश केला. १९९८ मधील राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ चित्रपटात त्यांना प्रमुख भूमिका मिळाली आणि तेंव्हापासून ते प्रसिद्धीच्या झोतात आले.

  April 23, 2022


साहित्य - ललित

क्लॅपरबाॅय

Category:

 

१९७१ मध्ये ‘मेरे अपने’चं शुटींग चालू असताना, दिग्दर्शकानं कॅमेरा, साऊंड व क्लॅपची ऑर्डर दिली.. मात्र क्लॅप देणाराच जागेवर नव्हता, तो कॅन्टीनमध्ये मैत्रीणीबरोबर गप्पा मारत बसला होता.. गुलजारजी जाम भडकले, त्यांनी त्या क्लॅपरबाॅयला हाकलून दिले.. व त्या जागेवर चंद्रशेखर नार्वेकर उर्फ एन. चंद्राची नेमणूक झाली.. याच एन. चंद्राने, त्यानंतर ‘परिचय’ पासून ‘आंधी’ पर्यंतचे गुलजार यांच्या सर्व चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले.. एका सशक्त दिग्दर्शकाच्या परिसस्पर्शाने एन. चंद्रा नावाचा मराठी, यशस्वी निर्माता-दिग्दर्शक घडला..

  April 23, 2022


साहित्य - ललित

23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन, कॉपीराइट दिन आणि नाटककार शेक्सपिअर यांचा जन्म आणि स्मृतीदिन

Category:

 

वाचन संस्कृतीच्या चर्चेशिवाय पुस्तकदिन पोरकाच. वाचन संस्कृतीवर आलेली अवकळा व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट यांचा अकारण सकारण संबंध जोडला जातो आणि संबंधाचा सबळ पुरावा देण्यासाठी अलीकडच्या मुलांच्या वाचन सवयीवर अमर्याद चर्चा होऊन पूर्णविराम दिला जातो. अलिकडची मुलं वाचत नाहीत. मुलांना पुस्तक उपलब्ध नाही. ही विधाने जितकी खरी वाटतात तितकेच प्रश्नही निर्माण करतात व तिथेच थांबतात. मात्र आजच्या दिनाच्या औचित्याने आडातले पोहणाऱ्यांना नक्कीच आणता येईल.

  April 23, 2022


व्यक्ती-परिचय

गायक उस्ताद बडे गुलामअली खान

Category:

 

जेव्हा मोगले आझम या चित्रपटाकरता गाणे म्हणण्यासाठी जेव्हा संगीतकार नौशाद आणि दिग्दर्शक के असिफ यांनी पाचारण केले तेव्हा खासाहेबांनां गाण्याची इच्छा नव्हती म्हणून टाळण्याकरता त्यांनी ऐका गाण्याचे २५००० रुपये मानधन मागितले (त्याकाळात आघाडीचे गायक ३०० ते ५०० रुपये मानधन घेत असत) आणि असिफ यांनी ते देऊ केले.

  April 23, 2022


व्यक्ती-परिचय

नाटककार विल्यम शेक्सपिअर

Category:

 

त्याच्या ३८ नाटकांपैकी १० ऐतिहासिक नाटके आहेत, १६ सुखात्मिका आहेत तर १२ शोकात्म नाटके आहेत. त्याची अगदी प्रारंभीची नाटके म्हणून ‘रिचर्ड तिसरा’ व ‘हेन्री सहावा’ ही ऐतिहासिक नाटके ओळखली जातात. त्याच्या अनेक नाटकांच्या नेमक्या लेखनवर्षांबद्दल मतभेद असले तरी सर्वसाधारणपणे ‘टायटस ॲ‍टड्रोनिकस’, ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ व ‘टेमिंग ऑफ द श्र्यूय’ ही नाटके त्याच्या उमेदवारीच्या काळातील मानली जातात.

  April 23, 2022


लेखसंग्रह

अधिष्ठाता विठ्ठल

Category:

 

आषाढीचा मुहूर्त गाठत विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी, वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या वाटेवर पडत आहेत. भक्तांच्या गर्दीत त्यांना विठोबाचं दर्शन होणार नाही, कदाचित…पण त्यांना लांबून दिसणारा विठ्ठलमंदिराचा कळसही पुरतो दर्शनासाठी…कारण त्यांचा विठ्ठल, त्यांच्या हृदयातच तर वसतो!

  April 23, 2022


दिनविशेष

जागतिक पुस्तक दिवस

Category:

 

आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या साह्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच थरातून वाढले आहे. ती गोष्ट सत्यही आहे कारण वाचनाव्यतिरिक्त रेडिओ, टेलिव्हिजन, कंप्युटर, चित्रपट, नाटके, इतर मनोरंजनाची साधने इतकी जास्त वाढली आहेत की या सर्व गलबल्यात मनुष्याला वाचण्यासाठी निवांतपणाच मिळेनसा झाला आहे.

  April 23, 2022


व्यक्ती-परिचय

ब्राझीलियन फुटबॉलपटू काका

Category:

 

काका हा २००७ मध्ये बॅलोन डी ओर पुरस्कार जिंकणारा व त्याच साली फीफाचा सर्वोत्तम खेळाडू (‘प्लेअर ऑफ द इयर’) या पुरस्काराने गौरवण्यात आलेला खेळाडू होत. त्याला हा पुरस्कार देण्यासाठी स्वत: पेले हजर होते, हा ब्राझीलच्या फुटबॉलचा मान म्हणायला हवा.

  April 22, 2022


व्यक्ती-परिचय

अमेरिकेचे ३७ वे राष्ट्रपती रिचर्ड निक्सन

Category:

 

१९७२ साली चीनच्या जनता-प्रजासत्ताकास अधिकॄत भेट देऊन अमेरिका-चीन राजनैतिक संबंध पुन्हा स्थापण्यात पुढाकार घेतला, तसेच त्याच वर्षी सोव्हियेत संघाशी क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्रांवर मर्यादा घालून घेण्याचा तह केला. चंद्रावर मानव पाठवण्याच्या अमेरिकी प्रयत्नांना अपोलो ११ च्या रूपाने निक्सन प्रशासनाच्या कार्यकाळातच यश लाभले; तरीही एकंदरीत दॄष्टिकोनातून पाहता निक्सन प्रशासनाने समानव अंतराळ मोहिमा सीमित करण्याचेच धोरण अनुसरले.

  April 22, 2022


व्यक्ती-परिचय

भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे

Category:

 

जम्मू-काश्मीरमधील बटालियनचं नेतृत्व केल्याबद्दल – सेना पदक, आसाम रायफल्सचे महानिरीक्षक (उत्तर) म्हणून नागालँडमधील सेवेसाठी – विशिष्ट सेवा पदक, स्ट्राईक कॉर्प्सचं नेतृत्त्व केल्याबद्दल – अतिविशिष्ट सेवा पदक, आर्मी ट्रेनिंग कमांडमध्ये GOC-in-C म्हणून सेवा केल्याबद्दल – परम विशिष्ट सेवा पदक अशी लेफ्टनंट जनरल नरवणेंना पदके मिळाली आहेत.नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवायांनी धुमसणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत काम केले आहे.

  April 22, 2022