वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू अल्विन कालिचरण
Category:
व्यक्ती-परिचयविंडीजचा त्याचा सहकारी अँडी रॉबर्ट्स हा त्याच्या मते सर्वात वेगवान गोलंदाज, विंडीज तोफखान्याचा तो जणू भिष्माचार्यच! बेदी, प्रसन्ना, चंद्रा या भारतीय फिरकी त्रिकुटाबद्दल त्याला प्रचंड आदर वाटतो. बेदीच्या गोलंदाजीतील विविधतेचे त्याला अपार कौतुक. इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत या दोन डावखुर्यांयतील द्वंद्व विलक्षण रंगायचे. प्रसन्ना चेंडूला उंची देण्यात पटाईत होता. तो फिरकी गोलंदाज असूनही त्याचे काही चेंडू फार वेगात पडायचे असे तो सांगतो.