प्रख्यात दूरदर्शन निर्मात्या डॉ. किरण चित्रे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteडॉ.किरण चित्रे या माहेरच्या किरण तासकर. डॉ.किरण यांचा जन्म अहमदनगरचा. बालपण शालेय शिक्षण शारदाश्रम विद्यामंदिर येथे व महाविद्यालयीन शिक्षण रुईया महाविद्यालय मुंबईत झाले. डॉ.किरण चित्रे यांना प्रसारण क्षेत्रांत खूप जण मानतात. किरण चित्रे या निर्मिती सहाय्यक ते सहाय्यक संचालक एवढ्या पदापर्यंत विविध स्तरांवर दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर गेली ३३ वर्ष कार्यरत होत्या.