अध्यात्मिक-धार्मिक

निरंजन – भाग ४७ – आपल्या प्रत्येक देण्यामध्ये येणं हे आहेच

Category:

 

काय परिणाम होईल हे माहिती नसताना देखील, जेव्हा जयदीपने विश्वासाने स्वतःजवळ जे पण आले ते देण्याची तयारी ठेवली तेव्हाच त्याने त्या मोबद्ल्यात कितीतरी जास्त पटीने सुख मिळवले. जेव्हा आपण आपली मनस्थिती बदलतो तेव्हाच आपण आपल्या परिस्थितीत बदल घडवु शकतो.

  April 29, 2021


कथा

तो, ती आणि मी

Category:

 

तो कधी कधी मला त्या बस स्टॉपवर दिसत असे , पण एकटाच ..ठराविक वेळी आठ ते साडेआठच्या दरम्यान.
सुमारे चार वर्षांपूर्वी तो मला असाच दिसत असे पण त्याच्या बायकोबरोबर .
तो तिला सोडायला येत असे. डोक्याला अर्थवट टक्कल , जाड भिंगाचा चष्मा , जरा उंच पण बळकट.
…आणि ती अत्यंत सुंदर , ओठाला लिपस्टिक ..जास्त गडद नाही , उत्तमपणे साडी नेसलेली..थोड्याशा उंच हिल च्या चपला .
खूपच सुंदर होती, नजर सतत खाली , जास्त बोलणे नाही ….

  April 29, 2021


दिनविशेष

भारतात रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात

Category:

 

२५ एप्रिल १९८२ रोजी भारतात रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात झाली. १९८२ मध्ये भारतात झालेल्या ‘एशियाड’ या आशियायी क्रीडा स्पर्धेमुळे भारतातले क्रीडाप्रेम किती वाढीला लागलं हे माहीत नाही; मात्र त्यानिमित्तानं रंगीत झालेल्या टीव्हीचं प्रेम मात्र झपाट्यानं वाढत गेलं हे नक्की !

  April 27, 2021


व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ साहित्यिक व झुलवाकार उत्तम बंडू तुपे

Category:

 

तब्बल १६ कादंबऱ्यांसह अनेक लघुकथांना शब्दरूप देणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांची ‘झुलवा’ ही कादंबरी प्रचंड गाजली. तेव्हापासून ते ‘झुलवा’कार म्हणूनच ओळखले जाऊ लागले. खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी, भस्म, चिपाड, इंजाळ, झावळ या त्यांच्या कादंबऱ्याही गाजल्या. अनेक कादंबऱ्यांना पुरस्कार मिळाले.

  April 27, 2021


अस्तु’ – उत्तरायणाचे लामणदिवे !
लेखसंग्रह

अस्तु’ – उत्तरायणाचे लामणदिवे !

Category:

 

काही चित्रपट बघितल्याशिवाय मरायचं नसतं म्हणे ! “अस्तु ” त्यातील एक आहे. एकदा बघितला की संवेदनांची समृद्धी वाढते. वारंवार बघितला की जगण्याचे पापुद्रे अलगद सुटत जातात आणि मोकळं व्हायला होतं.

  April 27, 2021


दिनविशेष

बरसात चित्रपटाची ७२ वर्षे

Category:

 

राजकपूर यांनी बरसात या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत धमाल उडवली होती. चित्रपट सर्वच दृष्टीने गाजला. राजकपूर यांचा बरसात चित्रपट म्हणजे ही जणू एक भावस्पर्शी कविताच होती. या चित्रपटामुळे राजकपूर यांच्या बहुढंगी व्यक्तिमत्वाचे दर्शन झाले. २१ एप्रिल १९४९ रोजी बरसात चित्रपट प्रदर्शित झाला होता. राजकपूरचे गुरू केदार शर्मा यांच्या मते ‘बरसात’ राजकपूरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. एक भावमधुर निसर्गरम्य आणि संगीतमय चित्रपट म्हणून बरसातचा उल्लेख करावा लागेल.

  April 26, 2021


व्यक्ती-परिचय

बिनतारी यंत्रणेचा शोधक गुग्लिएल्मो मार्कोनी

Category:

 

गुग्लिएल्मो मार्कोनीच्या रुपाने असा माणूस पृथ्वीवर अवतरलाच. बिनतारी संदेशवहनाच्या बाबतीत कसलीही पार्श्वभूमी नसताना मार्कोनीने या तंत्रज्ञानाला सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात नेऊन ठेवले आणि अतिशय लोकप्रिय बनवले.

  April 26, 2021


लेखसंग्रह

सनी देओलचा ‘मोहल्ला अस्सी’

Category:

 

कल्याणी ताई आमच्या एका व्याख्यानात म्हणाल्या होत्या- ” देव आपली परीक्षा पाहात असतो. ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत तो मदतीला येत नाही, पण (भक्तांचे) १२ ही वाजू देत नाही.” अस्सी घाटावर शांतपणे दिवे सोडणाऱ्या सनी – साक्षी बरोबर आम्हां पती-पत्नीलाही त्यावेळी कल्याणी ताईंच्या वाक्यामागे साक्षात काशी विश्वेश्वर उभा असलेला जाणवला.

  April 26, 2021