शेख हसीना यांचा भारताचा दौरा आणि बांगलादेशी घुसखोरी
Category:
लेखसंग्रहबांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद ४-७ ओक्टोबर भारत दौर्यावर होत्या. आपल्या संसदीय निवडणुकीनंतर त्यांची ही पहिलीच भारतभेट होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची भेट घेतली. दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने आपण सुवर्णअध्याय लिहू या, असे मोदी यांनी हसिना यांना बंगाली भाषेत सांगितले.