कबूल
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रहया विश्वामधे अनेक ठिकाणी अनेक Universes असू शकतात आणि त्यातील काही असे असू शकतात की तिथे तुमच्या हुबेहूब जीवनाचे प्रति रूप असू शकते अर्थात समांतर ब्रम्हांड. अशी ही Theory सांगते.
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआमचे ज्ञानी विद्वान आजही शंका काढतात की आमची संस्कृती इतकी प्राचीन असती तर तसे अनेक पुरावे सापडायला हवे होते. खरं म्हणजे अशी शंका मांडण्यापूर्वी त्यांनीं कांहीं गोष्टी ध्यानांत घ्यायला हव्या. एक म्हणजे भारतातील हवामान. भारतातल्या मान्सूनच्या पावसामुळे व दमट हवेमुळे लाकडी बांधकाम व भूर्जपत्रांवरील लेखन हें नष्ट होणारच ; तें शतकानुशतके टिकणें अशक्यच आहे. भारतातील सर्वच महत्त्वाची शहरें हजारो वर्षांपासून ‘जिवंत शहरे’ (Living Cities) आहेत हे सर्वमान्य ऐतिहासिक सत्यही येथें लक्षात घ्यायला हवें.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteवर्षाचे आजवरचे अनेक फोटो मी पहिले होते. वर्षातल्या अभिनेत्रीसोबतच तिच्यातल्या शिक्षिकेची बाजू एकाच छायाचित्रात मांडण्यासाठी हा फोटो महत्त्वाचा ठरणार होता. फोटो काढताना वर्षाला मी पूर्वकल्पना न देता केवळ या बोर्डाच्या बाजूला शिक्षिकेच्या पात्रात तुम्ही असाल तर कसे हावभाव असतील असं विचारून मी त्यांचे हे भाव टिपत होतो.
Category:
साहित्य - ललितकैरोमधल्या पिरॅमिडबद्दल शाळेत असल्यापासून कुतूहल होतंच. Chariots of Gods आणि इतर काही पुस्तकांमधून पिरॅमिड व तत्सम इतर अवाढव्य कलाकृतींबद्दल वाचून त्याविषयीचे आकर्षण वाढले. एवढे अवाढव्य काम कोणी केले असेल, कशासाठी केले असेल याची उत्सुकता निर्माण झाली. ‘चॅरिएट्स ऑफ गॉड’ मध्ये ब-याच आश्चर्यकारक जागांचा व बांधकामांचा उल्लेख आहे. हिस्ट्रीचॅनलवर तेंव्हा एक‘ एनशियंट एलियन्स ’म्ह्णून एक मालिकाही बघण्यात आली व नास्काच्या रेषा, पिरॅमिड्स, चीनची भिंत वगैरे ब-याच माहितीची भर पडली.त्यातल्या त्यात पिरॅमिडस हे जरा जवळचे वाटले. म्हणून पिरॅमिडच्या तीव्र ओढीने आम्ही इजिप्तचा विचार करू लागलो म्हटले तरी चालेल.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रहस्वत:ला मोठ्या अभिमानाने ‘सावित्रिच्या लेकी’ म्हणवून घेणाऱ्या आजच्या आधुनिक स्त्रिया शिक्षणाने फक्त साक्षर झाल्या, सुशिक्षित व्हायचं मात्र विसरल्या, असं म्हटलं तर चुकू नये. मला वाटतं सावित्रीच्या कार्याचा अर्थ स्त्रियांना केवळ साक्षर करणं एवढाच नव्हता, तर त्यांना त्यांचा त्या त्या काळातील अधिकार मिळवून द्यायचा, असाही होता. हे जर आजच्या स्त्रियांना समजत नसेल, तर मग आजच्या स्त्रियांना स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, असं मी समजतो.
Category:
लेखसंग्रहभारताला अफगाणिस्तानपर्यंत जाण्यासाठी पाकिस्तान नेहमीच आडकाठी आणत असे. यावर तोडगा काढण्यासाठी भारताने इराणमार्गे अफगाणिस्तानात मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला. भारताने यासाठी इराणच्या चाबहार बंदरात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आणि इराण ते अफगाणिस्तानपर्यंत रस्तेमार्गाचीही निर्मिती केली. परिणामी इराणच्या चाबहार बंदरातून भारताला थेट अफगाणिस्तानात जाण्याचा व अफगाणिस्तानला रस्तेमार्गाने थेट समुद्रापर्यंत येण्याचा पर्याय खुला झाला व पाकिस्तानला त्याची जागाही दाखवून देता आली.
Category:
साहित्य - ललितडोंगरे डॉक्टरांचे म्हणणे लोकांना किती पटले कोणाक ठाऊक.कारण गाव तसे अंधश्रद्धाळू. भुता खेतांचे अस्तित्व मानणारी बहुतेक माणसे. महादूची ही हकीगत गावात सगळीकडे पसरली, त्याला तिखट मीठ लाऊन शेजारच्या गावात पण पोचली आणी त्यानंतर जयरामचे भूत नंतर अनेकांना त्या रस्त्यावर वडाच्या झाडा जवळ सगळ्यांना दिसू लागले.
Category:
लेखसंग्रहनैसर्गिकरित्या ऊर्जा वाढवणारी केळी आपण नियमितपणे योग्य प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरते. म्हणूनच आपल्याकडे पूर्वापार उपवासाला केळी खाण्याची पद्धत आहे. प्रसादाला पण केळ्याचा मान असतो. कुठल्याही मंगलकार्यात आपण केळ्याचे खांब दरवाजाला बांधायची पद्धत आहे. असे हे बहुगुणी केळं आपल्या आहारात योग्य प्रमाणात समाविष्ट करणं, आपल्या आरोग्यासाठी हितकारक ठरते.
Copyright © 2025 | Marathisrushti