No Picture
लेखसंग्रह

समय है ‘युग’परिवर्तन का

Category:

 

शेवटी युग पाठक यांना अटक झाली. त्यांना पश्चाताप होत असावा, असं ते स्वत:हूनच पोलीसांसमोर हजर झाले त्यावरून वाटतं. श्री. युग पाठक यांना फारशी शिक्षा होऊ नये असं मला मनापासून वाटतं. कारण, पश्चाताप होणं हेच सर्वात मोठं प्रायश्चित आहे, असं आपलं अध्यात्मही सांगतं. श्री. युगजी पाठक गेले सततचे ९ दिवस या पश्चातााच्या आगीत होरपळले आहेत, येवढी शिक्षा त्यांना पुरेशी आहे. ‘शरण आलेल्याला मोठ्या मनाने माफ करावं’ हे ही भारतीय तत्वज्ञानाशी सुसंगतच आहे..! ’युग’परिवर्तन म्हणतात, ते बहुदा हेच असावं..!!

No Picture
साहित्य - ललित

शिवी : हृदयाचा सेफ्टी व्हाॅल्व्ह !

Category:

 

शिवी हा कोणत्याही संस्कृतीचा अविभाज्य भाग असतो. शिव्यांच्या शब्दांवरून, पद्धतीवरून त्या त्या भागातील संस्कृती समजते. कोकणात तर ‘शिवी’ ही ‘ओवी’ म्हणूनच स्विकारली जाते. शिवी देणा-याला काही वाटत नाही आणि घेणा-याला तर त्याहून काहीच वाटत नाही.

No Picture
व्यक्ती-परिचय

शिवाजी’ हे नाव आयुष्यभर सन्मानपूर्वक धारण करणारा अभिनेता शिवाजी गणेशन्

Category:

 

विल्लुपूरम चिनय्या गणेशन हे त्यांचे मूळ नाव. दक्षिणेत “श” ऐवजी “स” चा वापर होतो म्हणजे सिवाजी गणेसन. मध्यमवर्गीय तमीळ कुटूंबात त्यांचा जन्म झाला. एकदा शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर बेतलेल्या नाटकात त्यानां मूख्य भूमिका मिळाली. नाटकाचे नाव होते “शिवाजी कंदा हिंदू राज्यम्” यातील शिवाजी महाराजांची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. एका सार्वजनकि सभेत त्यावेळचे प्रसिद्ध समाजसेवक ई.व्ही.रामास्वामी यांनी त्यांचा “सिवाजी” असा उल्लेख केला आणि नंतर आयुष्यभर त्यांचे हेच नाव रूढ झाले. काय गंमत आहे बघा तमीळ ‘विल्लुपूरम चिन्नय्याचा’ शिवाजी गणेशन झाला तर मराठी ‘शिवाजी गायकवाडचा’ तमीळ रजनीकांत झाला. आणि दोघेही आपापल्या काळातले श्रेष्ठ अभिनेते ठरले.

No Picture
लेखसंग्रह

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर दीपमाळ आणि ‘चास’चा किल्लेवाडा

Category:

 

मी दिव्यांचा संग्रह करायला सुरुवात केल्याला आता ५० वर्षे पूर्ण होतील. या निमित्ताने सध्या महाराष्ट्रातील सर्वात सुंदर दीपमाळांचा शोध घेत आहे. पुण्याच्या राजगुरुनगरजवळ चासकमान येथील सोमेश्वर मंदिरातील २५६ दिव्यांची दीपमाळ ही अत्यंत देखणी दीपमाळ आहे. ही संपूर्ण दीपमाळ, चारही बाजूच्या भिंतीतील कोनाडे आणि गावातील नदीकाठावरील शेकडो कोनाडे दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेला दिव्यांनी उजळलेले पाहायला प्रत्यक्ष सोमेश्वर नक्कीच अवतरत असेल ! या दीपमाळेसह आणखी काही वैभवशाली इतिहासाच्या श्रीमंत खुणा पाहायला मिळाल्या.

No Picture
शहरे आणि गावे

कन्याकुमारी

Category:

 

कन्याकुमारी हे तामिळनाडु राज्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळ आणि धार्मिक केंद्र आहे. देशाच्या दक्षिण टोकावर ते वसलेले आहे. हे ठिकाण पूर्वी केप कॉमोरीन नावाने ओळखले जात होते.

उटी
शहरे आणि गावे

उटी

Category:

 

उटी हे तामिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्यातील महत्वाचे शहर आहे. निलगिरी जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात असून, ते देशातील एक सुंदर हिलस्टेशन आहे. निलगिरि पर्वतरांगांच्या कुशीत ते वसलेले आहे.