हिवाळ्यात काय खाल?
खाद्ययात्रा

हिवाळ्यात काय खाल?

Category:

 

मस्त सुखद थंडी पडली आहे, थंडीमुळे खवळणारी भूक आणि डोळ्यांसमोर सुंदर भाज्या आणि फळांचे ढीग! छान छान, चविष्ट पदार्थ बनवायला अजून काय कारण हवं? खरंच बाजारात ताज्या ताज्या भाज्यांचे आणि फळांचे ढीग पाहून छान काहीतरी बनवावंसं वाटतं ना? ताजे मटार, केशरी लाल गाजरं, पांढरा शुभ्र फ्लॉवर, हिरव्या तरतरीत रंगाच्या पालेभाज्या, कोथिंबिरीच्या जुड्या, फ्रेश रंगांची उधळण करणारी डाळिंब, संत्री, लहानपण जागवणारी बोर, पेरू… व्वा क्या बात है! चला या छानशा ऋतूत चविष्ट आणि हेल्दी रेसिपीज खाऊन तंदुरुस्त राहू या

paratha-300
खाद्ययात्रा

आजचा विषय पराठा

Category:

 

पराठ्याचे साहित्य एकत्र करून घट्टसर पीठ मळून घ्या. एका पातेल्यात थोडे तूप गरम करा. त्यात आले, मिरेपूड, पनीर, मीठ व कॉर्नफ्लोअरची पेस्ट घाला. गार झाल्यावर पुदिना व कोथिंबीर चिरून घाला. हे सारण पराठ्यात भरून पराठे लाटून घ्या. तेल सोडून चांगले खरपूस भाजा.

Puding-300
खाद्ययात्रा

आजचा विषय पुडिंग भाग दोन

Category:

 

जेलीचे एक पाकीट घेऊन त्यावरील सूचनेप्रमाणे जेली बनवावी व फ्रिजमध्ये अर्धवट सेट झाली की त्यात फळांचे काप मिसळून पुन्हा सेट होण्यास फ्रिजमध्ये ठेवावी. अर्धा लिटर दुधाचे कस्टर्ड बनवून गार करून घ्यावे. सेट झालेल्या जेलीवर या गार कस्टर्डचा थर द्यावा. पुन्हा थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवून नंतर त्यावर क्रीम पसरून घालावे. नंतर सुक्या चेरीज, डाळिंबाचे दाणे, काजू – बदामाचे काप यापैकी कशानेही आवडीप्रमाणे सजावट करावी.

methi-300
खाद्ययात्रा

आजचा विषय मेथी भाग दोन

Category:

 

सतलज नदीच्या पाण्यावर पोसलेली, पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील कसूर येथील मेथी उत्तम स्वादाची समजली जाते. या स्थानावरूनच तिला ‘कसुरी मेथी’ हे नाव मिळालं. भारतातील पंजाब राज्यातही तिचं उत्पादन होतं. तिची वाळवलेली पानं ‘कसुरी मेथी’ म्हणून विकली जातात. ही पानं कित्येक पंजाबी आणि उत्तर हिंदुस्तानी पदार्थांमध्ये स्वादासाठी वापरली जातात.

हिवाळ्यात काय खाल?
खाद्ययात्रा

आजचा विषय मेथी भाग तीन मोड आलेली मेथी.

Category:

 

मोड आलेली मेथी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. विशेषतः मधुमेहाच्या आजारात, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ही मेथी उपयुक्त ठरू शकते. वजनाची चिंता असणाऱ्यांना मोड आलेल्या मेथीचे पदार्थ विशेष फायद्याचे ठरतात. आपल्या वाढणाऱ्या वजनाची, ब्लडशुगर आणि कोलेस्टेरॉलची काळजी वाटू लागली असेल तर यावर एक उत्तम उपाय आहे,

हिवाळ्यात काय खाल?
खाद्ययात्रा

आजचा विषय अळीव

Category:

 

अळीव म्हणजे थंडीतला खुराक आणि बाळंतिणीचं खाणं हे समीकरण आपल्याला माहीत आहे. लोहाने समृद्ध असलेल्या अळिवात कॅल्शियम, बीटा कॅरोटिन आणि प्रथिनंही असतात.

alive-300
खाद्ययात्रा

अळीव पराठा

Category:

 

एक वाटी दूध गरम करून त्यात अळीव भिजत घालावे. दोन तासाने तुपावर रवा भाजून घ्यावा, त्यात खोबरं, चिमूटभर मीठ, अळिवासकट दूध आणि उरलेलं दूध घालून रवा शिजवावा, त्यात गूळ घालून मऊ सांजा करावा, जायफळ घालावं. कणकेमध्ये चवीला मीठ आणि एक मोठा चमचा तेल घालून सैलसर कणीक भिजवावी. थोडय़ा वेळाने कणकीच्या पारीत सांजा भरून, लाटून पोळ्या भाजाव्या. हा पराठा खायलाही चविष्ट आणि पौष्टिकही असतो.

हिवाळ्यात काय खाल?
खाद्ययात्रा

आजचा विषय हादग्याची पानं व फुले

Category:

 

अगस्तीची म्हणजेच हादग्याची पाने. प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्त्व ‘अ’ हे दृष्टीला पोषक असलेत्या बीटाकॅरोटिन हे तत्त्व अगस्तीच्या पानांमध्ये प्रचंड प्रमाणात, गाजरापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात असते.

shevgyachi-Paane-300
खाद्ययात्रा

आजचा विषय शेवग्याची पाने

Category:

 

भारतात महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूत शेवग्याची शेती केली जाते. आयुर्वेदिक दृष्ट्या शेवग्याची पाने ही औषधी असुन यामध्ये अ ब क हि जिवनसत्वे, लोह, कँल्शीअम यासारखी खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. पानांची पावडरची प्रक्रिया करून पदार्थ साध्या पद्धतीने बनविता येतात, असुन त्याला जगभरात मोठी मागणी आहे.