साहित्य - ललित
तत्वांसाठी आग्रही असणारे विनय आपटे
Category:
साहित्य - ललितमाझे शिक्षण गिरगावातील आर्यन शाळेत झाले. आमच्या चाळीतील काही मित्र गिरगाव अन्ग्रेवाडीतील हिंद विद्यालय शाळेत शिकत होते. मित्राच्या घरच्यांचे आणि त्या शाळेतील आपटेबाईंचे घरघुती संबंध होते. त्यावेळेस शिक्षक पालकांना निरोप देऊन पालकांना शाळेत भेटण्यासाठी बोलावून विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा चालला आहे याबद्दल खरी माहिती देत असतं.