वेधस पंडीत
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteवेधस पंडित म्हणजे मराठी माणसाच्या तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाला अधोरेखित करणारा, व भारताचा झेंडा अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये डौलाने फडकविणारा एक कर्तुत्ववान तरूण आहे. बालमोहन विद्यामंदिर येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या वेधसला लहान्पणापासूनच प्रत्येक गोष्टीला स्वतःचा वेगळा स्पर्श देण्याची सवय होती. रामनारायण रूईया, सी. ओ. इ. पी., व आय. आय. टी. अशा मुंबईमधल्या व पुण्यामधल्या नामांकित, व व्यक्तिस्वातंत्र्याला चालना देणार्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतल्यामुळे त्याच्यातील, सतत नाविन्याच्या शोधात असलेल्या तंत्रज्ञाला चांगला व रेखीव आकार मिळाला.
August 16, 2011