लेखसंग्रह

घरातच फुलवा बाग

Category:

 

घराभोवती बाग फुलवण्याची कितीही इच्छा असली तरी आजच्या फ्लॅट संस्कृतीमुळे बागेसाठी जागा पुरत नाही. अशा वेळी निसर्गप्रेमींना घरातच बाग फुलवावी असे वाटते. इनडोअर प्लॅन्ट्समुळे ते सहज शक्य होते. या रोपांमुळे घर सुशोभित होतेच, पण हवेतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढही होते. थोडी काळजी घेतली आणि वेळेवर खत-पाणी दिले तर घरातील बागही आपल्याला बाहेरच्या बागेसारखाच आनंद देते.

  January 11, 2011


अवर्गिकृत

बोफोर्सच्या भुताची पंचविशी

Category:

 

एखाद्याच्या मागे ठरावीक समस्येचा ससेमिरा कायम राहतो तशी काँग्रेसची अवस्था झाली आहे. बोफोर्स प्रकरण बाहेर आल्यावर गदारोळ उडाला आणि त्या लाटेत काँग्रेसला पराभूत व्हावे लागले. त्यामुळे सत्तेवर आल्यावर येनकेनप्रकारेन हे भूत गाडून टाकायचे असा काँग्रेसचा निर्धार होता. त्या दृष्टीने केलेले प्रयत्न बर्‍यापैकी यशस्वी झाले. पण, आता इतक्या वर्षांनंतर हे भूत पुन्हा जागे होऊन काँग्रेसच्या मानेवर बसले आहे.

  January 11, 2011


अवर्गिकृत

पीक विमा योजनेची नवी संकल्पना

Category:

 

गेल्या वर्षी लांबलेल्या पावसाने आणि आता अचानक वाढलेल्या थंडीमुळे कृषीक्षेत्र अडचणीत आले. खरे तर अलीकडे तापमानातील बदल आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. अशा वेळी त्याला शासनाकडून नुकसानभरपाई दिली जात असलेली तुटपुंजी आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विमा कोष ही नवी संकल्पना अस्तित्वात यायला हवी.

  January 11, 2011


बोन डेन्सिटोमेट्री (हाडांची घनता)
आरोग्य

बोन डेन्सिटोमेट्री (हाडांची घनता)

Category:

 

वयाच्या ३५ नंतर हाडांमधील कॅल्शिअमचे प्रमाण पुरुष-स्त्रियांमध्ये हळूहळू कमी होते; परंतु काही स्त्रियांमध्ये एकदम जोरात घसरु लागते व अशा स्त्रियांना कंरदुखी, पाठदुखी व थोड्याशा दुखापतीमध्ये फ्रॅक्चर होणे असे आजार भेडसावू लागतात. म्हणून साधारण ४० नंतर प्रत्येक व कंबरदुखी असलेल्या सर्व पुरुषांनी बी.डी.एम. हा पास करुन, आपल्या हाडांची घनता कशी आहे, हे अधूनमधून बघितले पाहिजे.

  January 10, 2011


लेखसंग्रह

माहिती अधिकार बळकट होतोय

Category:

 

भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढ्याला बळ प्राप्त व्हावे या उद्देशाने माहिती अधिकार कायद्याचा आग्रह धरण्यात आला. हा कायदा अस्तित्वात येताच विविध प्रकारे मिळवलेल्या माहितीद्वारे भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत. असे असताना माहिती मिळवणार्‍यांवर दबाव आणण्याचे, मारहाण करण्याचे प्रकार वाढत आहेत. मात्र, याला जनताच प्रखर विरोध करेल आणि भ्रष्टाचारमुक्त समाजाची नवी पहाट पहायला मिळेल असे वाटते.

  January 10, 2011


अवर्गिकृत

कमवा आणि खर्च करा

Category:

 

नवीन वर्षात भारतात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत. आजघडीला कंपन्या चांगली कौशल्ये असणार्‍या कर्मचार्‍यांना आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी विविध योजना आखत आहेत. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या कमाईत भरघोस वाढ होणार आहे. त्याच वेळी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असल्याने सामान्यांच्या खर्चातही वाढ होणार आहे.

  January 10, 2011


अवर्गिकृत

महामार्ग बनलेत मृत्यूचे सापळे

Category:

 

सध्याच्या वेगवान युगात वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन रस्ते सुधारणांवर भर दिला जात आहे. शिवाय प्रशस्त रस्त्यांची बांधणीही केली जात आहे. तरीही वाहतूक खात्याचे दुर्लक्ष आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करण्याची चालकांची प्रवृत्ती आदी कारणांमुळे रस्त्यांवरील अपघातांची संख्या वरचेवर वाढत आहे. परिणामी, हे रस्ते मृत्यूचे सापळे बनत आहेत. ही परिस्थिती कोण आणि कशी बदलणार हा खरा प्रश्न आहे.

  January 10, 2011