आयुर्विमा समजुन घ्या
Category:
लेखसंग्रहआयुर्विम्याचा उद्देश हा घरातील कर्ता माणूस गेल्यावर त्याच्या कुटुंबाला साधारणपणे तीच जीवनशैली जगता यावी यासाठी तरतूद करणे हा आहे असे ढोबळमानाने म्हणता येईल. थोडक्यात विम्याची आलेली रक्कम गुंतवून त्याच्या उत्पन्नातून त्या कुटुंबाला जगता आले पाहिजे असा यामागचा विचार आहे. पण हळूहळू विमा कंपन्यांनी विविध प्रकारच्या योजना काढून या विचाराची व्याप्ती वाढवली. विम्याला करसवलत लागू केल्याने याकडे एक गुंतवणुकीचे साधन म्हणूनही पाहण्यास सुरुवात झाली. आपण या लेखात ढोबळमानाने या योजनांचा विचार करणार आहोत.