माझे मन तुझे झाले !

 



|| हरि ॐ ||

माझे मन तुझे झाले

नवनितावाणी होते झाले,

बंध रेशमाचे त्यास

मुलायम तंतूने विणलेले!

तुझ्या टपोऱ्या डोळ्यात

मन माझे गुंतत जात,

वटारल्या डोळ्याने

परत ते भानावर येत!

माझ्या मनातील घालमेल

तुझ्याही मनात होत होती!

काय सांगावे किती सांगावे

वाट कसलीशी बघत होती!

तुझ्या मुक्या संमतीने, मनाने सोडले मौन,

बोलता तुझ्याशी एकरूप झाले केव्हा मन !

स्पर्शाने बऱ्याच गोष्टी नकळत कळतात

आहे मनात हळुवार प्रेमातील स्पर्शज्ञान !

रातराणीचा मोहक सुगंध

मनात घाली गुंजी,

माझे मन तुझे होता,

बेभान झालीस त्या धुंदी !

जगदीश पटवर्धन, बोरीवली (प)

— जगदीश पटवर्धन

Author