मज्जाच मज्जा

मुला-मुलींची सहल ठरली । राणीच्या बागेत बसने गेली….



मुला-मुलींची सहल ठरली । राणीच्या बागेत बसने गेली

रंगीबेरंगी पक्षांचा किलबिलाट । गाणी जणू गाताहेत भाट

हरणे, सांबरे धावू लागली । मुलांना खूपच मज्जा वाटली

शेंगा खात माकडे होती । नकटी नाके खाजवत होती

माकडा माकडा हूप । तुझ्या शेंडीला तूप

मुलांना वाटी गंमत खूप । तोच डरकाळी ऐकू आली

पट्टेवाले वाघ दिसले । मुलांनी दुरुनच त्यांना पाहिले

पिंजर्‍यात सिंहराज होते बसले । दाढी हलवून डोळे रोखले

गर्जना ऐकून सारे घाबरले । धावत-पळत पुढे गेले

झेब्र्यापेक्षा जिराफ लंबू । इथे तुम्ही पोरांनो नका थांबू

पाणमांजर, साळूंकी, कासव, ससे । गेंडा बघून आले हसे

दणकट गजराज समोर दिसला । सोंड उभारून सलाम केला

भूक लागली भूक लागली गलबला झाला

मुलांचा चमू गोलाकार बसला

डबे खाऊन फस्त झाले

पाणी पिऊन शांत झाले

फिरून फिरून सारे दमले

बसमध्ये जाऊन बसले

आई-बाबांची आठवण आली

घरी जायची घाई झाली

खुषीत मुले घरी आली

मज्जाच मज्जा सांगू लागली

— मराठीसृष्टी व्यवस्थापन

Author