— ओंकार काळे
जपून ठेवा खरेदीची कागदपत्रे
शिक्षण असो वा नोकरी-व्यवसाय, प्रत्येक ठिकाणी सतत कोणत्या ना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासते. काही कागदपत्रे तर आयुष्यात सतत उपयोगी ठरतात. त्यामुळे अशा कागदपत्रांची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची ठरते. पण, याकडे गांभीर्याने लक्ष न देणार्यांचीच संख्या अधिक आहे. मग योग्य कागदपत्रां अभावी नुकसान सहन करावे लागल्यास पश्चात्ताप करण्याशिवाय हातात काही उरत नाही.