गुरूपौर्णिमा

जीवनाच्या प्रत्येक टप्प्या टप्प्यावर. गुरूंचाच प्रभाव असतो आपल्याराहण्या आणि वागण्या – बोलण्यावर.
गुरूच दूर करीत असतात जळमटेजमलेली आपल्या बुध्दीवर.



गुरू मिळ्त असतात अनेक आपल्याला

जीवनाच्या प्रत्येक टप्प्या टप्प्यावर…

गुरूंचाच प्रभाव असतो आपल्याराहण्या आणि वागण्या – बोलण्यावर…
गुरूच दूर करीत असतात जळमटेजमलेली आपल्या बुध्दीवर…
गुरूच शिकवत असातात आपल्यालाविश्वास ठेवायला स्वतःवर…
गुरूच देऊन वळ्ण आपल्या जगण्यालाघेऊन जातात यशाच्या शिखरावर…
गुरूच दाखवितात मार्ग आपल्यालासत्याची कास धरूण जाण्याचा मोक्षाच्या मार्गावर…
गुरूच देतात ताकद सर्वांना मात करण्याचीजीवनातील प्रत्येक संकटावर…
म्ह्णूनच गुरूपौर्णिमेच्या दिवशी वाहू याआपली निष्ठा, प्रेम, आदर आणि समर्पकता त्यांच्या चरणावर …
कवी- निलेश बामणे ( एन.डी.)

— निलेश बामणे

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →