एक धागा सुखाचा

१९६० साली प्रदर्शित झालेल्या जगाच्या पाठीवर या चित्रपटातील हे गीत. सखाराम नावाच्या एका सामान्य माणसाभोवती या चित्रपटाचे कथानक फिरते..





१९६० साली प्रदर्शित झालेल्या जगाच्या पाठीवर या चित्रपटातील हे गीत. राजा परांजपे आणि सीमा यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. सखाराम नावाच्या एका सामान्य माणसाभोवती या चित्रपटाचे कथानक फिरते. गदिमांच्या लेखणीतून साकार झालेल्या या गाण्याचे गायक व संगीतकार होते बाबुजी अर्थात सुधीर फडके.

एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे

जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे

पांघरसी जरी असला कपडा

येसी उघडा, जासी उघडा

कपड्यासाठी करीसी नाटक, तीन प्रवेशांचे

मुकी अंगडी बालपणाची

रंगीत वसने तारुण्याची

जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे

या वस्त्रांते विणतो कोण

एकसारखी नसती दोन

कुणा न दिसले त्रिखंडात त्या, हात विणकर्‍याचे


Author