एकदा तरी हो म्हणं !

आई ह्या शब्दाची व्याख्याच करता येणार नाही. आई सारखे दुसरे दैवत जगात नाही. आईचे ऋण काश्यानेही भरून येणार नाहीत त्यासाठी आईच व्हावे लागेल. एक प्रयत्न..!



|| हरी ॐ ||

‘आई ती आई इतरांवरून वणवा जाई’ !

ही म्हण सार्थ करण्या…

नऊ महिने, नऊ दिवस मला तुझ्या उदरात सांभाळस,

अन्न आणि दिलास वि-श्वास !

हे विश्व दाविण्या किती कळा सोसल्यास,

तुझं बाळ तुझ्या कुशीत झोपावं म्हणून

किती विनवण्या केल्यास !

लहानाचे मोठेकरण्या किती कष्ट घेतलेस,

मला भरपेट मिळवं म्हणून स्वत: उपाशी राहिलीस !

चांगले शिक्षण मिळावे म्हणून किती राबलीस,

मी मोठा झालेलो पाहण्यासाठी किती कस्था खाल्यास !

बाबा अचानक गेल्याने त्यांची उणीव भरून काढलीस,

मला बरे नसता रात्र रात्र जागून काढलीस !

मला शांत झोप लागावी म्हणून

पायाचे तळवे काश्याची वाटी घेऊन तुपाने चोळलेस !

आता मात्र तू आराम करायचा,

आई मला आवडेलच तुझ्याच पोटी परत पुन्हां जन्मण्या पण….!

निदान पुढल्या जन्मी मी तुझी आई होऊन….!

आईच सत्य, प्रेम, आनंद, माया, कष्ट, यातना, दु:ख

आणि वास्तल्य आई होऊन अनुभवू दे

तुझ्यावर आई होऊन मायेची पाखर घालू दे,

असं होण्या एकदा तरी हो म्हणंशील ना?

जगदीश पटवर्धन, बोरीवली (प)

— जगदीश पटवर्धन

Author