झिम्मा

पिझ्झा बेकतो. वास सुटतो,

मुंबईचा राजा डिस्को खेळतो



पिझ्झा बेकतो. वास सुटतो,
मुंबईचा राजा डिस्को खेळतो
रोल रोल रॉक एॅण्ड रोल,
जाझच्या तालावर सावरा तोल ।।
सर सर गोविंदा येतो,
मजवरी चिखल फेकीतो
या – या होंडावरुनी या,
आमचा नखरा पहा पहा ।।
सलवार कमीज बॉयकट,
वेण्यांची नको कटकट
आमच्या वेण्या कोठल्या,
फॅशनसाठी छाटल्या ।।
घडवा घडवा हो पेठे
चांदी सोन्याचे गळपट्टे ।
गळपट्टयाला खडे तीन,
आम्ही कॉलेजच्या आहोत क्वीन ।।
लाड सांगू पप्पांना,
पैसे मागू सिनेमांना ।
आमच्या मैत्रिणी हाय-फाय,
सारख्या करतात हाय हाय,
बाय-बाय-बाय-बाय-बाय ।।

— सुधा मोकाशी

Author