वॉन्टॉन सूप

साहित्य सारणासाठी: २०० ग्रॅम चिकन खिमा, ३ पातीचे कांदे बारीक चिरून, १ टी स्पून लसूण- आले पेस्ट, लसूण-आले १ अंडे थोडे फेटून, ६-७ कप चिकन स्टॉक, १ टे. स्पून सोयासॉस, तेल, मीठ, मिरे पावडर, कोथिंबीर.

वॉन्टॉन पारीसाठी: ३ टे.स्पून मैदा, १ टे.स्पून कॉर्नफ्लोअर, वेळ: ५० मिनीटे पाव टी स्पून बेकींग पावडर, थोडे मीठ.

कृती: प्रथम वॉन्टॉनच्या पारीचे सर्व साहित्य एकत्र करा थोडे पाणी वापरून गोळा मळून तयार करा व झाकून ठेवा.

मधल्या सारणासाठी चिकन खिमा, पातीचा कांदा थोड्याशा तेलावर परतून घ्या. त्यात मीठ व अर्धा टी स्पून लसूण-आले पेस्ट घाला व वाफेवर शिजवून घ्या. हे सारण कोरडे राहिले पाहिजे. वॉन्टॉन करण्यासाठी मळलेल्या पीठाचे छोटे-छोटे गोळे करा व चौकोनी आकारात पारी लाटा. या प्रत्येक पारीवर खिम्याचे सारण घाला. पारीच्या कडेला फेटलेले अंडे लावून, त्रिकोणी आकारात त्याची टोके जुळवून चिकटवा. अशा प्रकारे सर्व वॉन्टॉन तयार करा. सारण कमी घाला व कडा जास्त दिसतील असे वॉन्टान करा.

आता चिकन स्टॉक उकळत ठेवावा. त्यात उरलेले आले-लसूण पेस्ट घाला. उकळी आल्यावर त्यांत सर्व वॉन्टॉन्स टाकून नंतर सोयासॉस, मीठ, काळेमिरे घालावे. ५-१० मिनिटे उकळी येऊ द्यावी. सर्व वॉन्टॉन्स शिजून वर यायला लागल्यावर गॅस बंद करा. बाऊलमध्ये सूप देताना दोन वॉन्टॉस द्यावे व वरून कोथिंबीर, थोडी चिरलेली पात घालावी.

Author