विचार आतला

विचार आतला,
काळोख दाटला,
घर उजळता,
दिसे आत्मा,--!!

चिंता, दु:खे,
बोचरी सुखे ,
हृदयाला भिडती,
विलक्षण खंता,--!!!

मी-- तू पणा गळतो,
अंतरात्मा छळतो,
मोक्ष मागतो,
प्राणांतील परमात्मा,--!!!

जीव सुटेना,
कर्मात, भोगात,
अडकून राहिला,
दार उघडेना,
मुक्काम बदलेना,--!!!

नसते हातात,
व्यथा हृदयात,
जिवा छळतात,
काळज्या बऱ्याचशा,--!!!

स्वर्ग नरक,
कल्पना नुसत्या,
माणसांच्या वस्त्या,
नकोशा, नकोशा,--!!!!

हिमगौरी कर्वे



विचार आतला,
काळोख दाटला,
घर उजळता,
दिसे आत्मा,–!!

चिंता, दु:खे,
बोचरी सुखे ,
हृदयाला भिडती,
विलक्षण खंता,–!!!

मी– तू पणा गळतो,
अंतरात्मा छळतो,
मोक्ष मागतो,
प्राणांतील परमात्मा,–!!!

जीव सुटेना,
कर्मात, भोगात,
अडकून राहिला,
दार उघडेना,
मुक्काम बदलेना,–!!!

नसते हातात,
व्यथा हृदयात,
जिवा छळतात,
काळज्या बऱ्याचशा,–!!!

स्वर्ग नरक,
कल्पना नुसत्या,
माणसांच्या वस्त्या,
नकोशा, नकोशा,–!!!!

हिमगौरी कर्वे

Author