ज्येष्ठ नाट्य- चित्रपट अभिनेत्री वत्सला देशमुख

शिर्डीचे साईबाबा हा मराठी आणि शिरडी के साईबाबा हा हिंदी चित्रपट त्याचप्रमाणे तुफान और दिया, जल बिन मछली नृत्य बिन बिजली, लडकी सह्याद्री की, हिरा और पत्थर,सुहाग मराठीत – अमर भूपाळी, वारणेचा वाघ, पिंजरा , झुंज, ज्योतिबाचा नवस, बाळा गाऊ कशी अंगाई, चिकट नवरा वगैरे चित्रपटांत त्यांनी भुमिका केल्या होत्या.



वत्सला देशमुख यांचा अल्पपरिचय.

प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या मातोश्री तसेच संध्या शांताराम या वत्सलाजींची बहीण होत.वत्सला देशमुख यांचे वडील श्रीधरपंत देशमुख हे बापुराव पेंढारकर यांच्या ललितकलादर्श कंपनीत होते. वत्सला देशमुख यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘तुफान और दिया’ या प्रसिध्द हिंदी चित्रपटातून केली होती.

शिर्डीचे साईबाबा हा मराठी आणि शिरडी के साईबाबा हा हिंदी चित्रपट त्याचप्रमाणे तुफान और दिया, जल बिन मछली नृत्य बिन बिजली, लडकी सह्याद्री की, हिरा और पत्थर,सुहाग मराठीत – अमर भूपाळी, वारणेचा वाघ, पिंजरा , झुंज, ज्योतिबाचा नवस, बाळा गाऊ कशी अंगाई, चिकट नवरा वगैरे चित्रपटांत त्यांनी भुमिका केल्या होत्या. पण खऱ्या अर्थाने त्यांना ओळख मिळाली ती ‘सुहाग’ ह्या चित्रपटातून त्यांचे नाव घरोघरी पोहचले होते.

‘पिंजरा’ चित्रपटामध्ये वत्सला देशमुख यांनी खलनायिकेकडे झुकणारी भूमिका रंगवली होती.‘पिंजरा’या चित्रपटा मध्ये त्यांनी संध्या यांच्या बरोबर अभिनय केला होता. पिंजरा चित्रपटातील भूमिका सोडली तर त्यांच्या अभिनय प्रवासात त्यांनी सकारात्मक भूमिकाच साकारल्या होत्या. प्रेक्षकांच्या मनावर त्यांच्या अभिनयाने गारुड निर्माण केलं होतं.

वत्सला देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author
लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →

MS Team 

This is editor1