ज्येष्ठ अभिनेते फारुख शेख

नुरी ओ दिलबर ...आजा रे ....
नुरी ह्या चित्रपटातील या ओळी आज ही आपल्याला फारूक शेख यांचा गोड चेहरा..
आणि सुंदर अभिनय आठवून जातात ..आपल्या सहजसुंदर अभिनयाने व अनोख्या अदाकारीच्या जोरावर सामान्यजनांच्या हृदयात स्थान मिळविणारे फारुख शेख यांनी वकिलीचे शिक्षण घेत असतानाच नाटय़क्षेत्रात प्रवेश केला. त्यांचा जन्म २५ मार्च १९४८ रोजी बडोदा जिल्ह्यातील अमरोली येथे झाला.बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी नाटकांत भूमिका केल्या. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट "गर्म हवा' होता. या चित्रपटात त्यांनी बलराज साहनीच्या मुलाची भूमिका केली होती. त्यात त्यांनी साकारलेला `सिकंदर मिर्झा’ सिनेप्रेमींच्या मनावर ठसला त्यानंतर, एकापेक्षा एक झक्कास भूमिकांमधून, आपल्या अनोख्या स्टाइलने मा.फारुख शेख यांनी बॉलिवूडमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण केले. बाजार’ किंवा `उमराव जान’सारखा कलात्मक चित्रपट असो किंवा `चष्मेबद्दूर’सारखा विनोदी चित्रपट असो. त्यातली आपली व्यक्तिरेखा फारुख शेख यांनी सारख्याच ताकदीने साकारली. सत्यजित रे यांच्या `शतरंज के खिलाडी’, `नुरी’, `किसी से ना केहना’ या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाला साऱ्यांनीच दाद दिली. मा.नासिरुद्दीन, मा.शाह दीप्ती नवल यांच्या बरोबर ‘कथा’ या चित्रपटात मा.फारुख शेख यांनी रंगवलेला व्हिलनही भाव खाऊन गेला होता. मा.दीप्ती नवलव मा. फारुख शेख जोडी तर बराच काळ हिट चित्रपटासाठीचा फॉर्म्युलाच होऊन गेली होती. दीप्ती नवल आणि फारुख शेख ही रुपेरी पडद्यावरील जोडी भारतीय प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिली. त्यानंतर "सास ७०-८० च्या दशकात फारूक शेख यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. समांतर चित्रपट आणि तसेच मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये त्यांचा मुक्त संचार सुरू होता. त्यांमनी अनेक दर्जेदार चित्रपट दिले. विनोद आणि संवेदनशील विषयांवर त्यां चा हातखंडा होता. नुरी, शतरंज के खिलाडी, चष्मे बद्दुर, गरम हवा इत्यारदी चित्रपट गाजले. सहजसुंदर अभिनय ही त्यांची जमेची बाजू होती. मा.फारुक शेख यांनी अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केले होते. `चमत्कार’, `जी मंत्रीजी’, `श्रीकांत’ या मालिकांमधील त्यांच्या अभिनयाने एक वेगळाच प्रभाव निर्माण झाला होता. झी टिव्हीवरील प्रसिद्ध `जीना इसी का नाम’ या शोचे त्यांनी सूत्रसंचालन केले होते. या शोमध्ये त्यांनी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींची मुलाखतही घेतली होती. सत्यजित रे, मुज्जफर अली, हृषिकेश मुखर्जी आणि केतन मेहता यांसारख्या दिग्दर्शकांसोबत फारुक शेख यांनी काम केले होते. शबाना आझमी, दीप्ती नवल अशा अभिनेत्रींसोबत फारूक शेख यांची जोडी अधिक गाजली. त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांच्या आवाजामध्ये एक वेगळेपणा होता. त्यांची विनोदशैली आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची वृत्ती यासाठी फारुक शेख यांची ओळख होती. फारुख शेख निव्वळ कलाकार नव्हते, तर माणुसकी जपणारे कलाकार होते. एक अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता, प्रचंड अभ्यासू कलावंत, असे फारुख शेख यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. प्रसन्न व्यक्तिमत्त्व, निरागस चेहरा आणि सहजसुंदर अभिनय या गुणांमुळे समांतर चित्रपटांत काम करतानाही मा.फारुख शेख सर्वसामान्य चित्रपट रसिकांचे ‘नायक’ बनलेले होते. `क्लब ६०′ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. `यह जवानी है दिवानी’ या चित्रपटामध्ये त्यांनी रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेला सिकंदर मिर्झा प्रेक्षकांना खूपच भावला होता. बहू और सेन्सेक्सो', "टेल मी ओ खुदा', "लाहोर' हे चित्रपटही गाजले. २०१० मध्ये या चित्रपटातील बॉक्सिं ग कोचच्या भूमिकेबद्दल त्यांना सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
फारुख शेख यांचे २७ डिसेंबर २०१३ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

फारुख शेख यांची गाणी व चित्रपट

https://youtu.be/E08DZkSc0S8

https://youtu.be/ycouT7JuZhs

https://youtu.be/BsHd1EGA46A



नुरी ओ दिलबर …आजा रे ….
नुरी ह्या चित्रपटातील या ओळी आज ही आपल्याला फारूक शेख यांचा गोड चेहरा..
आणि सुंदर अभिनय आठवून जातात ..आपल्या सहजसुंदर अभिनयाने व अनोख्या अदाकारीच्या जोरावर सामान्यजनांच्या हृदयात स्थान मिळविणारे फारुख शेख यांनी वकिलीचे शिक्षण घेत असतानाच नाटय़क्षेत्रात प्रवेश केला. त्यांचा जन्म २५ मार्च १९४८ रोजी बडोदा जिल्ह्यातील अमरोली येथे झाला.बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी नाटकांत भूमिका केल्या. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट “गर्म हवा’ होता. या चित्रपटात त्यांनी बलराज साहनीच्या मुलाची भूमिका केली होती. त्यात त्यांनी साकारलेला `सिकंदर मिर्झा’ सिनेप्रेमींच्या मनावर ठसला त्यानंतर, एकापेक्षा एक झक्कास भूमिकांमधून, आपल्या अनोख्या स्टाइलने मा.फारुख शेख यांनी बॉलिवूडमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण केले. बाजार’ किंवा `उमराव जान’सारखा कलात्मक चित्रपट असो किंवा `चष्मेबद्दूर’सारखा विनोदी चित्रपट असो. त्यातली आपली व्यक्तिरेखा फारुख शेख यांनी सारख्याच ताकदीने साकारली. सत्यजित रे यांच्या `शतरंज के खिलाडी’, `नुरी’, `किसी से ना केहना’ या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाला साऱ्यांनीच दाद दिली. मा.नासिरुद्दीन, मा.शाह दीप्ती नवल यांच्या बरोबर ‘कथा’ या चित्रपटात मा.फारुख शेख यांनी रंगवलेला व्हिलनही भाव खाऊन गेला होता. मा.दीप्ती नवलव मा. फारुख शेख जोडी तर बराच काळ हिट चित्रपटासाठीचा फॉर्म्युलाच होऊन गेली होती. दीप्ती नवल आणि फारुख शेख ही रुपेरी पडद्यावरील जोडी भारतीय प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिली. त्यानंतर “सास ७०-८० च्या दशकात फारूक शेख यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. समांतर चित्रपट आणि तसेच मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये त्यांचा मुक्त संचार सुरू होता. त्यांमनी अनेक दर्जेदार चित्रपट दिले. विनोद आणि संवेदनशील विषयांवर त्यां चा हातखंडा होता. नुरी, शतरंज के खिलाडी, चष्मे बद्दुर, गरम हवा इत्यारदी चित्रपट गाजले. सहजसुंदर अभिनय ही त्यांची जमेची बाजू होती. मा.फारुक शेख यांनी अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केले होते. `चमत्कार’, `जी मंत्रीजी’, `श्रीकांत’ या मालिकांमधील त्यांच्या अभिनयाने एक वेगळाच प्रभाव निर्माण झाला होता. झी टिव्हीवरील प्रसिद्ध `जीना इसी का नाम’ या शोचे त्यांनी सूत्रसंचालन केले होते. या शोमध्ये त्यांनी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींची मुलाखतही घेतली होती. सत्यजित रे, मुज्जफर अली, हृषिकेश मुखर्जी आणि केतन मेहता यांसारख्या दिग्दर्शकांसोबत फारुक शेख यांनी काम केले होते. शबाना आझमी, दीप्ती नवल अशा अभिनेत्रींसोबत फारूक शेख यांची जोडी अधिक गाजली. त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांच्या आवाजामध्ये एक वेगळेपणा होता. त्यांची विनोदशैली आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची वृत्ती यासाठी फारुक शेख यांची ओळख होती. फारुख शेख निव्वळ कलाकार नव्हते, तर माणुसकी जपणारे कलाकार होते. एक अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता, प्रचंड अभ्यासू कलावंत, असे फारुख शेख यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. प्रसन्न व्यक्तिमत्त्व, निरागस चेहरा आणि सहजसुंदर अभिनय या गुणांमुळे समांतर चित्रपटांत काम करतानाही मा.फारुख शेख सर्वसामान्य चित्रपट रसिकांचे ‘नायक’ बनलेले होते. `क्लब ६०′ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. `यह जवानी है दिवानी’ या चित्रपटामध्ये त्यांनी रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेला सिकंदर मिर्झा प्रेक्षकांना खूपच भावला होता. बहू और सेन्सेक्सो’, “टेल मी ओ खुदा’, “लाहोर’ हे चित्रपटही गाजले. २०१० मध्ये या चित्रपटातील बॉक्सिं ग कोचच्या भूमिकेबद्दल त्यांना सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
फारुख शेख यांचे २७ डिसेंबर २०१३ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

फारुख शेख यांची गाणी व चित्रपट

लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →