वेळेची किमया

वेळ येता उकल होते,
साऱ्या प्रश्नांची ।
जाणून घ्या तुम्ही,
रीत निसर्गाची...१,

जेंव्हां यश ना मिळते,
एखाद्या प्रश्नी ।।
वेळ नसे योग्य आली,
हेच घ्यावे जाणूनी...२,

प्रयत्न सारे चालूं ठेवतां,
यश ना मिळे ।
कांहीं काळासाठी थांबवा,
प्रयत्न सगळे...३,

काळ लोटतां प्रयत्न होती,
पुनरपि सारे ।
उकल होऊन गुंत्यांची,
आख्खे निघती दोरे...४,

कुणी म्हणती ग्रह अनूकुल,
ह्या घटनेला ।
हीच तर वेळेची किमया,
कशी कळे कुणाला....५

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



वेळ येता उकल होते,
साऱ्या प्रश्नांची ।
जाणून घ्या तुम्ही,
रीत निसर्गाची…१,

जेंव्हां यश ना मिळते,
एखाद्या प्रश्नी ।।
वेळ नसे योग्य आली,
हेच घ्यावे जाणूनी…२,

प्रयत्न सारे चालूं ठेवतां,
यश ना मिळे ।
कांहीं काळासाठी थांबवा,
प्रयत्न सगळे…३,

काळ लोटतां प्रयत्न होती,
पुनरपि सारे ।
उकल होऊन गुंत्यांची,
आख्खे निघती दोरे…४,

कुणी म्हणती ग्रह अनूकुल,
ह्या घटनेला ।
हीच तर वेळेची किमया,
कशी कळे कुणाला….५

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author