वेळेची किमया

वेळ येता उकल होते, साऱ्या प्रश्नांची ।

जाणून घ्या तुम्ही, रीत निसर्गाची...१,

जेंव्हां यश ना मिळते, एखाद्या प्रश्नी ।।

वेळ नसे योग्य आली, हेच घ्यावे जाणूनी...२,

प्रयत्न सारे चालूं ठेवतां, यश ना मिळे ।

कांहीं काळासाठी थांबवा, प्रयत्न सगळे...३,

काळ लोटतां प्रयत्न होती, पुनरपि सारे ।

उकल होऊन गुंत्यांची, आख्खे निघती दोरे...४,

कुणी म्हणती ग्रह अनूकुल, ह्या घटनेला ।

हीच तर वेळेची किमया, कशी कळे कुणाला....५

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०



वेळ येता उकल होते, साऱ्या प्रश्नांची ।

जाणून घ्या तुम्ही, रीत निसर्गाची…१,

जेंव्हां यश ना मिळते, एखाद्या प्रश्नी ।।

वेळ नसे योग्य आली, हेच घ्यावे जाणूनी…२,

प्रयत्न सारे चालूं ठेवतां, यश ना मिळे ।

कांहीं काळासाठी थांबवा, प्रयत्न सगळे…३,

काळ लोटतां प्रयत्न होती, पुनरपि सारे ।

उकल होऊन गुंत्यांची, आख्खे निघती दोरे…४,

कुणी म्हणती ग्रह अनूकुल, ह्या घटनेला ।

हीच तर वेळेची किमया, कशी कळे कुणाला….५

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author