व्हेजिटेबल सूप: (प्रकार २)

साहित्य: १ कप कोबी चिरून, २ गाजर चिरून, वेळ: : ३० मिनिटे ४ टोमॅटो, २ कांदे चिरून, १०-१५ फरसबी चिरून, १ मोठा बटाटा चिरून, २ लसणाच्या पाकळ्या, १ टे. स्पून चीझ, १ टे. स्पून लोणी, मीठ, मिरेपावडर, साखर चवीप्रमाणे.

कृती: टोमॅटो वेगळे ठेवून सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. पातेल्यात लोणी गरम करून त्यात लसूण ठेचून घालावी व कांदा घालून परतावे. थोडा मऊ झाला की त्यावर सर्व भाज्या घालून परतावे व दोन कप पाणी घालून भाज्या चांगल्या शिजवाव्या. शेवटी टोमॅटो चिरून घालावा. थोड्या उकळीनंतर गॅस बंद करावा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. मोठ्या गाळणीने गाळून घ्यावे. गाळताना दोन ते तीन कप पाणी वापरावे. गाळलेल्या सुपात मीठ, मिरेपावडर व थोडी साखर घालावी. सूप पुन्हा उकळवावे व गरम गरम द्यावे. बाऊलमध्ये वाढल्यावर वरून किसलेले चीझ घालावे.

Author