साहित्य: एका लहान कोबीच्या चार फोडी, २ गाजरे चिरून, ४-५ टोमॅटो, ३ कांदे, १५-२० फरसबी बारीक चिरून, २ लसूण पाकळ्या, वेळ: ३० मिनिटे २ बटाटे, १ टी चीज, स्पून २ चमचे लोणी, मीठ व मिरेपूड चवीपुरते.
कृती: सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. पातेल्यात थोडे लोणी घेऊन ते गरम होताच त्यात कांदा, लसूण, गाजर घालून परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये कोबी, फरसबी, टोमॅटो, बटाटा घालावा.
साधारण पाच कप पाणी घालून चांगले शिजवून घ्यावे. पुरण यंत्रामधून किंवा मिक्सरमधून काढून गाळून घ्यावे. त्यात मीठ, मिरेपूड घालावी. थोडा वेळ उकळवावे. चिरलेली कोथिंबीर व चीज पसरवावे व वेळेवर गरमच वाढावे.