व्हेज पॅनरोल्स

व्हेज पॅनरोल्स – Recipe



साहित्य: -दीड वाटी मैदा, अर्धा चमचा सोडा, १ कप दूध, चवीप्रमाणे मीठ, अर्धी वाटी शिजलेले मटार दाणे, पाव किलो बटाटे, अर्धा चमचा मिरपूड, २ चिरलेले कांदे, १ चमचा आले-लसूण पेस्ट, १ अंडे, अर्धा चमचा सोडा, तूप तळण्यासाठी व फोडणीसाठी.

कृती ÷ बटाटे उकडून सोलून कुस्करावे. अर्धा चमचा तूप गरम करून त्यात कांदा परतावा. त्यात आले लसूण पेस्ट, कुस्करलेले बटाटे, मटार दाणे, गरम मसाला, मीठ घालून एकजीव करावे.
मैदा, मीठ व सोडा, दूध एकत्र करून मिश्रण करावे. धिरड्याच्या पिठाप्रमाणे पीठ असावे. नंतर नॉनस्टिक तवा तापवून थोडे तेल घालून सारण अंदाजाने घालून रोल्स करावेत. दिंड्याप्रमाणे घडी घालावी. पॅनरोल्स पुदिन्याच्या चटणीसोवत खावेत.

Author