मराठी चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचा जन्म ६ डिसेंबर १९७६ रोजी झाला.
समाजातील घटनांवर तिरकस कटाक्ष टाकत विनोदाची शैली हाताळणारा उमदा दिग्दर्शक म्हणजे उमेश कुलकर्णी. वळू’, ‘विहीर’, ‘देऊळ’ सारख्या आशयसंपन्न चित्रपटांचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी केलेले आहे. त्यांच्या चित्रपटातील रंजकता हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे. ‘विहीर’, ‘देऊळ’,हायवे,आरपार या त्यांच्या चित्रपटांनी इंटरनॅशनल फिल्म फेस्ट्रीवल मधील सारी महत्वपूर्ण बक्षिसे पटकावली.
‘आरभाट कलाकृती या नावाने गिरीश – उमेश कुलकर्णी संस्था चालवतात.
‘देऊळ’ या चित्रपटासाठी गिरीश – उमेश कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय ‘सुवर्ण कमळ’ पुरस्कार मिळाला.
चाकोरीबाहेरचे काहीतरी करतानाच मनोरंजनाचा बाज न बिघडवता चित्रपट रंगवण्यात त्यांचा हातखंडा आहे.
उमेश कुलकर्णी गेली काही वर्षे लघुपटनिर्मितीसाठी चित्रपटकर्मीना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे.
अधिक विस्तृत लेखासाठी:
https://www.marathisrushti.com/articles/marathi-film-director-umesh-kulkarni-2/