उगाच काहीतरी – २९

काही गोष्टी या ओपन एंडेड सोडलेल्या बरे असतात म्हणजे पुढे काय झालं असणार हे आपण सांगण्यापेक्षा ज्याच्या त्याच्या कल्पनेवर सोडलेलं जास्त मजेशीर असतं आणि त्यातच धमाल असते जसं हीच गोष्ट बघा ना....
दिनकर रावांच्या मोठ्या मुलीचं लग्न तीन वर्षांपूर्वी झालं आणि नुकतंच दोन महिन्यापूर्वी धाकटीचही लग्न थाटामाटात पार पडलं. दोघींनाही चांगलीच स्थळं मिळाली आणि दोघी मुली त्यांच्या घरी सुखी आहेत.
एक दिवस दिनकर रावांना शांत विचार मग्न बसलेलं पाहून रोहिणी वहिनींनी त्यांना विचारलं अहो कसला विचार करताय?
दिनकरराव थोडे साचरातच बोलले- "काही नाही तू नेहमी म्हणायचीस ना की या मुलींसाठीच मी या घरामध्ये थांबली आहे नाहीतर केव्हाच सोडून निघून गेली असती. बस त्याची आठवण झाली.......... "
-- अमोल पाटील

काही गोष्टी या ओपन एंडेड सोडलेल्या बरे असतात म्हणजे पुढे काय झालं असणार हे आपण सांगण्यापेक्षा ज्याच्या त्याच्या कल्पनेवर सोडलेलं जास्त मजेशीर असतं आणि त्यातच धमाल असते जसं हीच गोष्ट बघा ना….
दिनकर रावांच्या मोठ्या मुलीचं लग्न तीन वर्षांपूर्वी झालं आणि नुकतंच दोन महिन्यापूर्वी धाकटीचही लग्न थाटामाटात पार पडलं. दोघींनाही चांगलीच स्थळं मिळाली आणि दोघी मुली त्यांच्या घरी सुखी आहेत.
एक दिवस दिनकर रावांना शांत विचार मग्न बसलेलं पाहून रोहिणी वहिनींनी त्यांना विचारलं अहो कसला विचार करताय?
दिनकरराव थोडे साचरातच बोलले- “काही नाही तू नेहमी म्हणायचीस ना की या मुलींसाठीच मी या घरामध्ये थांबली आहे नाहीतर केव्हाच सोडून निघून गेली असती. बस त्याची आठवण झाली………. “
— अमोल पाटील

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →