तूच माझा ईश्वर

मनांत ठसले रूप तुझे, येते नयना पुढे ।
रात्रंदिन मज चैन ना पडे.....।।धृ।।

शरीर जरी सुंदर मिळे ।
प्रयत्नांनी तूंच कमविले ।।
चपलता ही छाप पाडीते ।
लक्ष्य खेचूनी तुझ्याकडे
मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे ।१।

हासणे खेळणें आणि चालणें ।
'ढंगदार' तुझे बोलणे ।।
शरीरामधल्या हालचालींना ।
सहजपणाचे वळण पडे
मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे....।२।

स्वभाव आहे जरी मृदू तो ।
प्रसंग पडतां कठीण भासतो ।।
सज्जना पुढती नम्र दिसूनी ।
दुर्जना शिरीं वज्र पडे
मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे ....।३।

हृदयीं माझ्या घर करूनी ।
तव प्रतिमा दिली ठेवूनी ।।
ईश्वर तूंच खरा तो ।
पूजन सदैव करीते
मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे ....।४।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



मनांत ठसले रूप तुझे, येते नयना पुढे ।
रात्रंदिन मज चैन ना पडे…..।।धृ।।

शरीर जरी सुंदर मिळे ।
प्रयत्नांनी तूंच कमविले ।।
चपलता ही छाप पाडीते ।
लक्ष्य खेचूनी तुझ्याकडे
मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे ।१।

हासणे खेळणें आणि चालणें ।
‘ढंगदार’ तुझे बोलणे ।।
शरीरामधल्या हालचालींना ।
सहजपणाचे वळण पडे
मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे….।२।

स्वभाव आहे जरी मृदू तो ।
प्रसंग पडतां कठीण भासतो ।।
सज्जना पुढती नम्र दिसूनी ।
दुर्जना शिरीं वज्र पडे
मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे ….।३।

हृदयीं माझ्या घर करूनी ।
तव प्रतिमा दिली ठेवूनी ।।
ईश्वर तूंच खरा तो ।
पूजन सदैव करीते
मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे ….।४।
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author